14 वर्षीय भावाने सख्ख्या बहिणीलाच केले गरोदर; बाळाला जन्म दिला आणि...

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
क्वालालंपूर, 
malaysia-viral-news मलेशियामध्ये माणुसकीला धक्का देणारी घटना समोर आली आहे. एका घराच्या मागील भागात अतिशय गंभीर स्थितीत एक नवजात बाळ आढळले, ज्यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली.
 
malaysia-viral-news
 
पोलीस तपासात उघड झाले की, या बाळाची जन्मदात्री एक १६ वर्षाची अल्पवयीन मुलगी आहे आणि धक्कादायक बाब म्हणजे या बाळाचा पिता तिचाच १४  वर्षाचा सख्खा भाऊ आहे. पोलीस प्रमुख मोहम्मद सानी मोहम्मद सालेह यांनी सांगितले की, रक्ताच्या नात्यातील अनैतिक संबंधातूनच हे बाळ जन्माला आले आहे. समाजाच्या भीतीने आणि लोकलाजेस्तव, अल्पवयीन मुलीने बाळाला घराच्या मागील भागात बेवारस सोडले होते. malaysia-viral-news बाळाची प्रकृती गंभीर असल्याने त्याला त्वरित हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले. पोलिसांनी तातडीने कारवाई करत, वर्षांच्या मुलाला ताब्यात घेतले असून, सत्य उघड करण्यासाठी त्याला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
मलेशियाच्या कायद्यानुसार हा प्रकार अत्यंत गंभीर गुन्हा मानला जातो. पोलीस दोन प्रमुख कलमान्वये चौकशी करत आहेत — बाळ बेवारस सोडणे आणि सख्ख्या नात्यात शारीरिक संबंध ठेवणे. malaysia-viral-news या गुन्ह्यांसाठी ६ ते २० वर्षांच्या कारावासासह शिक्षा होऊ शकते. या निष्पाप जिवाचे प्राण धोक्यात टाकल्यामुळे पोलिसांनी या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे. घटनेमुळे संपूर्ण देशभर संतापाची लाट पसरली आहे.