मेगा ब्लॉक : गाड्या झाल्या रद्द

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
नागपूर,
mega block trains दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या डोंगरगड विभागाच्या अप लाईनवर अतिरिक्त लूप लाईनसाठी प्री नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंगचे काम केले जाणार आहे. यामुळे २६ ते २८ डिसेंबरपर्यंत एकूण २१ गाड्या रद्द केल्या जातील.
 
 

मेगा ब्लॉग  
 
 
यामध्ये नागपूरला येणार्‍या आणि जाणार्‍या आठ गाड्यांचा समावेश आहे. २७डिसेंबरला ६८७४३ गोंदिया - इतवारी ६८७४४ इतवारी-गोंदिया मेमू आणि ५८२०५ रायपूर-इतवारी पॅसेंजर या गाड्या रद्द केल्या आहेत. २८ डिसेंबरला ६८७१३ गोंदिया-इतवारी मेमू, ६८७१४ इतवारी-बालाघाट मेमू, ६८७१५ बालाघाट-इतवारी मेमू, ६८७१६ इतवारी-गोंदिया मेमू आणि ५८२०६ इतवारी-रायपूर या पसेंजर रद्द केल्या आहेत.mega block trains याशिवाय या काळात काही पॅसेंजर गाड्यांच्या वेळेत बदल आणि गाड्या रद्द किंवा मार्गात विलंब होण्याची आहे.