नागपूर,
nagpur-news : भारतीय रेल्वेने शुक्रवार, २६ डिसेंबरपासून प्रवासी भाड्यात वाढ जाहीर केली आहे. प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही प्रवासी दर वाढ लागू असेल. तर उपनगरीय सेवा, मासिक हंगामी तिकिटे आणि २१५ कि.मीटरपर्यंतच्या सामान्य वर्गाच्या प्रवासासाठी कोणतीही वाढ होणार असे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले आहे. प्रवासी भाड्यात वाढ जाहीर केल्याने नागपूर रेल्वे स्थानकावरून देशाच्या विविध भागात प्रवास करणार्या प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागणार आहे. विशेषतः नागपूरहून पुणे, मुंबई, दिल्ली, हावडा, इंदूर इत्यादी लांब पल्ल्याच्या मेल, एक्सप्रेस गाड्यांमधून प्रवास करणार्या प्रवाशांना आर्थिक फटका बसणार आहे.
दैनंदिन प्रवाशांच्या श्रेणीत बदल
रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर स्थानकावरून प्रवास करणार्या दैनंदिन प्रवासी आणि उपनगरीय प्रवाशांच्या श्रेणींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. २६ डिसेंबरपूर्वी बुक केलेल्या तिकिटांवर प्रवाशांना जुने भाडे भरावे लागेल. अधिक माहितीसाठी, आयआरसीटीसी अॅप किंवा अधिकृत रेल्वेच्या वेबसाइटला भेट द्यावी, अशी सूचना केली आहे. नवीन प्रवास भाडे अंदाजे खालीलप्रमाणे असेल. यात प्रामुख्याने ते पुणे शहरासाठी जुने भाडे ५१० ते ५४० रुपये स्लीपर क्लासचे होते तर नवीन भाडे रु. ५२८ ते ५५८ झाले आहे. थर्ड एसीचे भाडे रु. १२०० ते १४०० रुपये होते. नवीन भाडे रु. १२१८ ते १४१८ रुपये होणार आहे. याशिवाय सेकंड एसीचे १७०० ते २ हजार रुपये होते. नवीन रु. १७१८ ते २०१८ रुपये होईल. नागपूर ते मुंबई स्लीपर क्लासचे जुने प्रवास भाडे ४२० ते ४५० रुपये होते. आता नवीन भाडे रु. ४३७ ते ४६७ होईल. थर्ड एसीचे भाडे रु. ११५० ते १३०० रुपये होते. नवीन प्रवास भाडे ११६७ ते १३१७ रुपये राहील. तसेच सेकंड एसीचे १६०० ते रुपये भाडे होते, नवीन भाडे १६१२ ते १९१२ रुपये राहील.
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार २६ डिसेंबरपूर्वी बुक केलेल्या तिकिटांवर प्रवाशांना जुने भाडे भरावे लागेल. अधिक माहितीसाठी, कृपया आयआरसीटीसी अॅप किंवा अधिकृत रेल्वे वेबसाइटला भेट द्या.