अपघातीमृत्यू राेखण्यात नागपूर राज्यात पहिल्या स्थानावर

- दुसऱ्या स्थानावर पालघर तर तिसऱ्या स्थानावर अमरावती - ऑपरेशन यू-टर्न’मुळे अपघातांना ब्रेक;

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
अनिल कांबळे
नागपूर, 
preventing accidental deaths राज्यात दिवसेंदिवस रस्ते अपघाताचे प्रमाण वाढत असले तरी नागपूर पाेलिसांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन यू-टर्न’मुळे अपघातीमृत्यू राेखण्यात नागपूर राज्यात पहिल्या स्थानावर आहे. दुसऱ्या स्थानावर पालघर शहर तर तिसऱ्या स्थानावर अमरावतीचा क्रमांक लागताे. गेल्या वर्षीच्या तुलनेत नागपुरात अपघाती मृत्यू संख्या तब्बल 90 ने कमी झाल्याची नाेंद अप्पर पाेलिस महासंचालक (वाहतूक) कार्यालयात झाली आहे.

अपघात  
 
 
पाेलिस आयुक्त डाॅ. रविंद्रकुमार सिंगल यांच्या सकारात्मक अभियानामुळे शहरात बरेच उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्यात महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ‘ऑपरेशन यू-टर्न’ उपक्रम गेल्या जुलै 2025 पासून राबविण्यात येत आहे. उपराजधानीत रस्ते अपघात आणि अपघाती मृत्यूच्या संख्येवर नियंत्रण मिळावे, यासाठी डाॅ.सिंगल प्रयत्न करीत हाेते. सर्वाेच्च न्यायालयाने नेमलेल्या रस्ता सुरक्षा समितीने अपघात मृत्यूत किमान 10 टक्के घट करण्याचे उद्दिष्ट ठेवले हाेते. त्यापेक्षा दुपटीने यश मिळाल्याने रस्त्यांवर हाेणाऱ्या अपघाती मृत्यूचा दर राेखण्यात नागपूर आयुक्तालय पहिल्या स्थानावर पाेहचले आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी सज्ज असलेल्या तरुणाईचा उन्माद राेखण्यासाठी पाेलिसांर्ते शहरात मंगळवारपासून 131 ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. गेल्या वर्षभरात ‘ऑपरेशन यू-टर्न’ मुळे प्राणांतिक अपघाताच्या 80 घटना कमी झाल्या. यात 90 जणांचे प्राण वाचवणे शक्य झाले. महाराष्ट्र पाेलिस दलाच्या अतिरिक्त पाेलिस महासंचालक (वाहतूक) कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 2024 च्या तुलनेत 2025 मध्ये नागपुरात तब्बल 26 टक्क्यांनी मृत्यू दर कमी झाला. तसेच पालघरमध्ये 20 टक्के आणि अमरावती शहर 17 टक्के दर कमी झाला. पुण्यातील अपघाती मृत्यू संख्या 55 तर छत्रपती संभाजी नगरातील अपघाती मृत्यू संख्या 18 ने कमी झाली, अशी माहिती पाेलिस आयुक्त डाॅ. रविंद्रकुमार सिंगल यांनी दिली.
राेज 3 हजार वाहनचालकांची तपासणी
दारु पिऊन वाहने चालवणाऱ्यांमुळे सर्वाधिक अपघात हाेत असतात. त्यामुळे दारुड्या वाहनचालकांवर धडाक्याने कारवाई करण्यासाठी अभियान राबविण्यात आले. यामध्ये राेज 3,000 पेक्षा अधिक जणांची तपासणी केली जात आहे.preventing accidental deaths चालू वर्षात आतापर्यंत 5,366 प्रकरणे नाेंदवली गेली. दुसऱ्यांदा दारु पिऊन वाहन चालवताना साडपल्यास त्याच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला. अशा आराेपींना न्यायालयानेसुद्धा 15 दिवसांचा कारावासाची शिक्षा दिली आहे. शहरात दरराेज फिरत्या पद्धतीने 90 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात येते.
कायदा माेडणाऱ्यांवर वचक
अतिवेग, चुकीच्या बाजूने वाहन चालविणे, ट्रिपल सीट आणि बेदरकार वाहनचालना यावर विशेष पथके कार्यरत आहेत. दरराेज सरासरी 60 पेक्षा अधिक वाहनचालकांवर कारवाई हाेत असून, आतापर्यंत 880 प्रकरणे नाेंदवली गेली आहेत. दाेषींना ताब्यात घेऊन वाहने जप्त केली जात आहेत, अशी माहिती पाेलिस उपायुक्त लाेहित मतानी यांनी दिली.
उद्यापासून ते 31 डिसेंबरपर्यंत नागपूर पाेलिस विशेष अभियान राबवत आहेत. ‘थर्टी फस्ट’च्या नावावर गाेंधळ घालणारे आणि मद्यप्राशन करुन वाहन चालविणाऱ्यांना चांगला धडा शिकवल्या जाईल. रस्ते सुरक्षा म्हणजे फक्त कायद्याची अंमलबजावणी नव्हे, तर मानवी जीवनाचे संरक्षण आहे. शून्य अपघात मृत्यू या उदिष्ठांकडे आम्ही ठाम पावले टाकत आहाेत. नागरिकांनीही पाेलिसांना सहकार्य करावे.
- डाॅ. रविंद्रकुमार सिंगल, पाेलिस आयुक्त