लोकसहभागातून नागपूरचा विकास होणार

-जनतेच्या सूचनांवर आधारित भाजपचा निवडणूक जाहीरनामा -मनपा निवडणूकीसाठी ’क्युआर कोड’ व लिंकचे लोकार्पण

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
नागपूर,
municipal corporation election आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने लोकसहभागातून विकास’ हे ध्येय समोर ठेवून आपला निवडणूक जाहीरनामा जनतेच्या सूचनांवर आधारित तयार करण्याचा निर्णय घेतला माहिती भाजप शहर अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांनी दिली आहे. मनपा निवडणूकीसाठी ’क्युआर कोड’ व लिंकच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रवीण दटके, संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे आदी उपस्थित होते. जनतेच्या सूचनांवर निवडणूक जाहीरनामा तयार करण्यापूर्वी नागरिकांच्या तक्रारी विचारात घेतल्या जात आहे. यात नागपूरकरांच्या सूचना, भाजपचा संकल्प आदींचा समावेश आहे.
 
 
munciple corporation
 
तिवारी पुढे म्हणाले, आजच्या घडीला सर्वात वेगाने विकसित होणारे महाराष्ट्रातील शहर म्हणून नागपूर ओळखले जात आहे. भाजपच्या कार्यकाळात शहराच्या पायाभूत सोयीसुविधांपासून ते मेट्रोपर्यंत अनेक पथदर्शी दूरदर्शी प्रकल्प पूर्ण झाले आहेत. आता विकासाला अधिक व्यापक करण्यासाठी आणि समाजातील प्रत्येक घटकाचे प्रतिबिंब जाहीरनाम्यात उमटवण्यासाठी भाजपने थेट जनतेचे मत जाणून घेण्याचे ठरविले आहे. या उपक्रमाद्वारे शहरातील युवक, विद्यार्थी, महिला, कष्टकरी वर्ग,कर्मचारी,प्रबुद्ध नागरिक, व्यावसायिक,सामाजिक क्षेत्रातील बुद्धिजीवी नागरिक आधुनिक नागपूरसाठी अपेक्षित संकल्पना सुचवू शकतात.
झपाट्याने विकसित होत असलेल्या नागपूरमध्ये काही तांत्रिक मुद्दे किंवा नागरिकांना भेडसावत स्थानिक समस्या असल्यास, त्या थेट पक्षनेतृत्वापर्यंत पोहोचवण्याची ही एक सुवर्णसंधी आहे.municipal corporation election सर्व सकारात्मक सूचनांवर भाजप सखोल चर्चा करून त्यांचा समावेश आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात करणार आहे. आपल्या स्वप्नातील आणि समृद्ध नागपूरच्या निर्मितीसाठी सुजान नागरिकांनी पुढाकार घेऊन, आपल्या मनातील संकल्पना आणि सूचना लिंकच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवाव्यात,जेणेकरून भविष्यातील नागपूर अधिक सशक्त आणि होईल. नागपूरच्या प्रगतीत आपला हातभार लावण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.