ठाकरे गट 145–150 तर मनसे 65–70 जागांवर लढणार!

राज-उद्धव ठाकरे युती उद्या जाहीर

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Raj-Uddhav Thackeray alliance मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राज-उद्धव ठाकरे युतीची अधिकृत घोषणा उद्या होणार आहे. ठाकरे गट-मनसे युतीसाठी अंतिम जागावाटप ठरले असून, 227 प्रभागांपैकी ठाकरे गट 145 ते 150 जागांवर, मनसेला 65 ते 70 जागा मिळणार आहेत. शरद पवार गटासाठी 10 ते 12 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. ठाकरे गटाने 2017 च्या निवडणुकीत जिंकलेल्या काही जागा मनसेसाठी राखून ठेवलेल्या आहेत, जिथे अनेक माजी नगरसेवक शिवसेनेत गेले होते. त्यामुळे या जागांवर मनसेकडे ताकदवान उमेदवार उपलब्ध आहेत.
 
 

uddhav thackeray and raj thackeray 
भांडूप, कांदिवली, बोरिवली आणि मुलुंड परिसरातील काही जागांवर टिकाऊ तिढा काही काळ लांबला होता. मातोश्रीवर पार पडलेल्या बैठकीत शिवडी आणि दादरमधील तिढा मिटवला गेला, तर भांडूप, विक्रोळी आणि पश्चिम उपनगरातील काही जागांवर रस्सीखेच सुरू होता. जागावाटप पूर्ण झाल्यामुळे उद्या युतीची अधिकृत घोषणा होणार आहे. आजपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होणार असून, 31 डिसेंबर ही अंतिम तारीख आहे. जागावाटप निश्चित झाल्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी वेळ मिळेल, त्यामुळे दोन्ही पक्षांना याचा फायदा होईल.