रवी महाले कारंजाचे नवे तहसीलदार

अमरावती येथून बदलीने पदस्थापना

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
कारंजा लाड, 
ravi-mahale : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने तहसीलदार संवर्गातील अधिकार्‍यांच्या बदलीने पदस्थापनेबाबत महत्त्वाचा शासन आदेश निर्गमित केला आहे. २२ डिसेंबर रोजी काढण्यात आलेल्या शासन आदेशानुसार रवी महाले यांची कारंजा तहसीलदार पदी नियुक्ती करण्यात आली आहे.महाराष्ट्र शासकीय कर्मचार्‍यांच्या बदल्यांचे विनियमन आणि शासकीय कर्तव्ये पार पाडताना होणार्‍या विलंबास प्रतिबंध अधिनियम, २००५ मधील तरतुदींनुसार तसेच राज्य निवडणूक आयोगाच्या विविध आदेशांच्या अनुषंगाने ही पदस्थापना करण्यात आली आहे.
 
 
 
karanja
 
 
सार्वजनिक सेवेच्या हितार्थ व प्रशासकीय सोयीच्या दृष्टीने सक्षम प्राधिकार्‍यांच्या मान्यतेने हा निर्णय घेण्यात आला आहे.या आदेशानुसार तहसीलदार संवर्गातील अधिकारी रवी महाले यांची बदलीने पदस्थापना करण्यात आली आहे. सध्या ते सहायक प्राध्यापक, डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रशिक्षण प्रबोधिनी, अमरावती येथे कार्यरत आहेत.सदर बदली ही प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्याचे शासन आदेशात नमूद करण्यात आले असून, राज्य निवडणूक आयोगाच्या आचारसंहिता व निवडणूकविषयक आदेशांचे पालन करूनच ही पदस्थापना करण्यात आली असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.या नियुक्तीमुळे महसूल प्रशासनातील कामकाज अधिक गतिमान व कार्यक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वासस व्यक्त करण्यात येत आहे.