सरस्वतीत सप्तशक्ती संगम संमेलन

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
saptashakti-sangam-conference : विद्या भारती अखिल भारतीय शिक्षा संस्थान व स्थानिक भरत ज्ञान मंडळ द्वारा संचालित सरस्वती विद्या मंदिर इंग्रजी माध्यम प्रायमरी व प्रि प्रायमरी स्कूल येथे सप्तशक्ती संगम संमेलनाचे आयोजन शनिवार २० रोजी करण्यात आले होते. प्रमुख वता म्हणून विद्या गुज्जेेवार उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून वासंती देशपांडे तर अध्यक्षस्थानी संस्थेच्या संचालक अपर्णा हरदास होत्या. विद्या गुज्जेवार यांनी भारताच्या विकासात महिलांची भुमिका या विषयावर मार्गदर्शन केले. भाके यांनी कुटुंब प्रबोधन व पर्यावरण या विषयावर विचार व्यते केलेे. यावेळी काही पालकांनी मनोगत व्यत केले.
 
 
kl
 
प्रायमरी व प्रि प्रायमरी विभागाच्या शिक्षकांनी सरस्वती स्तवनावर आधारित नृत्य तर प्रि. प्रायमरी विभागाच्या शिक्षकांनी पर्यावरणावर आधारित भारूड सादर केले. यावेळी एकल मातांचा सत्कार करण्यात आला. स्त्री पालकांसाठी मायलेक समान वेशभूषा स्पर्धा, ग्लास पिरॅमिड, बाटली गेम या सारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या.आनंद - मेळावा हे कार्यक्रमाचे वैशिष्ट्य ठरले. मुख्याध्यापक आरती जोशी यांनी प्रास्ताविक केले. संचालन दीपाली हिंगणीकर व सोनाली वाघमारे यांनी केले. आभार माधुरी उंबरकर यांनी मानले. यशस्वीतेकरिता प्रायमरी व प्रि प्रायमरी विभागाच्या शिक्षका व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.