बांगलादेशात हिंसा...भारतीय संगीतकार ओळख लपवत परतले

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
ढाका,
Sarod player Shiraj Ali Khan बांगलादेशमधील वाढत्या दहशतवाद आणि हिंसाचारामुळे भारतीय संगीतकार शिराज अली खान संकटात सापडला. देशभरात हिंदूंवर झालेल्या अत्याचारांमुळे परिस्थिती अत्यंत अस्थिर झाली होती. गरिबी, उपासमार आणि अराजकता या परिस्थितीने नागरिकांना त्रस्त केले होते. कोलकात्याचा सरोद वादक शिराज अली खान १६ डिसेंबर रोजी ढाकाच्या बनानी येथे जाझ संगीत कार्यक्रमासाठी पोहोचला होता. मात्र, १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या प्रमुख शास्त्रीय कार्यक्रमाच्या काही तास आधी, कट्टरपंथी घटनेनंतर हिंसक जमावाने सांस्कृतिक केंद्रावर तोडफोड केली. या दंगलखोरांच्या हल्ल्यामुळे शिराजला आपली भारतीय ओळख लपवावी लागली आणि जीवाची प्राणापरि धास्तीने पळून कोलकात्याला सुटका करावी लागली.
 
 
 
Sarod player Shiraj Ali Khan
शिराज अली खानचे वडील उस्ताद ध्यानेश खान, प्रसिद्ध सरोद वादक उस्ताद अली अकबर खान यांचे पुत्र आणि बाबा अलाउद्दीन खान यांचे नातू आहेत. शिराज म्हणाला की, "काही वर्षांपूर्वी, उस्ताद अलाउद्दीन खान यांच्या नावावर असलेल्या ब्राह्मणबारियातील महाविद्यालयावर हल्ला झाला होता, परंतु छायानतवरील हल्ला आपल्या संस्कृती आणि सामायिक मूल्यांवर अकल्पनीय हल्ला आहे." शिराजने भारतात परत आल्यावर माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, त्याला कधीही अशी परिस्थिती येईल आणि त्याला आपली ओळख लपवावी लागेल, याची कल्पनाही नव्हती. हिंसक जमावाच्या ताब्यातून जीव वाचवून शिराज भारतात परत आला. हा प्रकार बांगलादेशमधील वाढत्या दहशतवादाची आणि धार्मिक हिंसाचाराची गंभीर माहिती देतो, ज्यामुळे सांस्कृतिक व्यक्तींना देखील आपली सुरक्षा धोक्यात आहे.