मुंबई,
Severe cold in Vidarbha राज्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाका वाढला आहे. किमान तापमानात लक्षणीय घट झाल्यामुळे नागरिकांना हुडहुडी भरत आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रात गारठा अधिक जाणवतो आहे. विदर्भातील नागपूर आणि गोंदियेत किमान तापमान ९ अंश सेल्सिअसवर असून भंडारा, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यांमध्ये १० अंशावर नोंदवले गेले. अमरावती, वाशिम जिल्ह्यात ११ अंश, अकोला आणि चंद्रपूर १२ अंश, उदगीर १२.४ अंश, नांदेड १०.५ अंश आणि धाराशिव ११.१ अंश सेल्सिअस तापमान नोंदले गेले. बीडमध्ये पारा ९.६ अंशावर होता.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसात किमान तापमानात २–३ अंशांची घट होईल. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट तीव्र राहील, तर उर्वरित भागात येत्या २४ तासात फारसा बदल दिसणार नाही. पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार तसेच मराठवाड्यात तापमान खूप घसरले आहे. सोमवारी निफाड येथे किमान तापमान ५.५ अंश सेल्सिअस नोंदवले गेले, धुळ्यात ५.८, परभणीत ६.२, अहिल्यानगर ७.४, मालेगाव ८.४, नाशिक ९.२ आणि बीड ९.६ अंश सेल्सिअस झाले. उत्तरेकडील वाऱ्यांचा प्रभाव वाढल्यामुळे मध्य महाराष्ट्रात गारठा वाढला आहे. पुण्यात शहरासह उपनगरांमध्ये तापमानात लक्षणीय घट झाली आहे. गेल्या आठवड्यात पुण्यात थंडीची लाट होती आणि आजही पारा ७ ते १५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. हवेली ७.५°, शिवाजीनगर, पाषाण, बारामती, दौंड ८–८.५°, आंबेगाव, तळेगाव १०–११°, हडपसर ११.२°, कोरेगाव पार्क १३°, मगरपट्टा १५.६° आणि चिंचवड १४.५° सेल्सिअस आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यातही तापमान खूप घसरले आहे. छत्रपती संभाजीनगर, परभणी १२°, नांदेड १०.५°, धाराशिव ११.१° आणि उदगीर १२.४°, बीड ९.६° सेल्सिअस नोंदवले गेले आहेत. सांगली १२.३°, रत्नागिरी १७.२°, सातारा १०.९°, छत्रपती संभाजीनगर १२°, नंदुरबार १४.१°, दहानू १५.२°, सोलापूर १३.६°, कुलाबा २०.५°, सियाझ १८.४°, परभणी १२.१°, मालेगाव ८.४°, नाशिक ९.२°, बीड ९.६°, हरणाई २०.७°, उदगीर १२.४°, नांदेड १०.५°, धाराशिव ११.१°, माथेरान १६.४°, ठाणे २०° अशी किमान तापमानाची नोंद आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसात थंडीची लाट अधिक तीव्र होईल, तर नागरिकांनी गरम कपडे आणि आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.