नप आटोपली; आता जिप, पंस निवडणुकीकडे डोळे

आरक्षण मर्यादा ओलांडल्याने अजूनही धाकधूक कायम

    दिनांक :23-Dec-2025
Total Views |
वर्धा,
municipal council elections जिल्ह्यातील पाच पालिकांसाठी तब्बल ९ वर्षांनी सार्वत्रिक निवडणूक आटोपल्यावर आता मिनी मंत्रालय म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद तसेच ८ पंचायत समितीच्या निवडणुकीकडे इच्छूकांचे डोळे लागले आहेत. नगर पालिकांच्या निवडणुकीआधी जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणूक होईल, अशी आधी शयता होती. राज्यातील ज्या २० जिपनी ५० टके आरक्षणाची मर्यादा ओलांडली आहे, त्यात वर्ध्याचाही समावेश आहे. सोबत ३ पंचायत समितींचेही आरक्षण मर्यादेपेक्षा जास्त आहे. परिणामी, निवडणूक लांबणार तर नाही अशी भीती इच्छुक उमेदवारांना आहे.
 

munciple 
 
 
भाजप, काँग्रेस या प्रमुख पक्षांसह इतर पक्षांनीही जिल्हा परिषद, पंचायत समितींच्या निवडणुकीच्या अनुषंगाने उमेदवार शोध मोहीम सुरू केली आहे. भाजपमध्ये एकाच गटात, गणात एकापेक्षा जास्त इच्छुक निवडणुकीच्या उमेदवारीसाठी बाशिंग बांधून तयार आहे. नेत्यांच्या गाठी-भेटीचे सत्रही सुरू आहे. निवडणुका होईल आणि तिकीट मिळेल या आशेत काहींनी देवाधर्माचे कार्यक्रम, खेळांच्या बक्षिसांचा खर्च करून तो आता थांबविला आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत. वर्ध्याचे आमदार डॉ. पंकज भोयर हे राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. भाजपाचे जिल्ह्यातील पक्षसंघटनही मजबूत आहे. अशा परिस्थितीत महाविकास आघाडीला भाजपला रोखण्याचे आव्हान राहणार आहे. महाविकास आघाडीकडून लढताना शरद पवार गटाचे अमर काळे खासदार झाले. काळे, माजी राज्यमंत्री रणजित कांबळे, माजी. आ. प्रा. सुरेश देशमुख, काँग्रेसच्या नेत्या अ‍ॅड. चारूलता टोकस, शेखर शेंडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले हे एकत्र लढतात काय हे बघावे लागणार आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेसने नगर पालिका निवडणुकीत हिंगणघाट वगळता पाचही नगर पालिकांमध्ये ओपनिंग केल्याने त्यांना थोडी ताकद मिळाली आहे.
आर्वी, वर्धा आणि देवळी या ३ पंचायत समित्यांचे आरक्षण ५० टयांपेक्षा अधिक आहे.municipal council elections त्यामुळे ५३.८२ टयांपर्यंत जातीय आरक्षण असलेल्या वर्धा जिप यासह ३ पंचायत समित्यांची निवडणूक दुसर्‍या टप्प्यात होण्याची शयता आहे. याबाबत निवडणूक आयोगाकडून कोणतेही स्पष्ट दिशा-निर्देश प्राप्त झालेले नाही.
जि.प.चे ५२ गट, पं.स.चे १०४ गण
जि. प. चे ५२ गट, तर ८ पंचायत समितीचे मिळून एकूण १०४ गण राहणार आहेत. मागील निवडणुकीत जिप वर भाजप आणि मित्रपक्षांची सत्ता होती. पंचायत समित्यांवरही भाजपाचाच वरचष्मा होता.
अ‍ॅड. निलेश हेलोंडे पाटील आज वर्धेत
 
वर्धा : कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष अ‍ॅड. निलेश हेलोंडे पाटील मंगळवार २३ रोजी वर्धेच्या दौर्‍यावर येत आहेत. ते दुपारी २.३० वाजता महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकीकरण संस्था (एमगीरी) येथे भेट व संत्रा प्रक्रियाबाबत विभाग प्रमुख व शास्त्रज्ञ यांच्या समवेत बैठक व चर्चा करतील. सायंकाळी ५ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात चारा लागवडीबाबत बैठक व चर्चा करतील.