वर्धा,
accident : दुचाकीने रस्ता ओलांडत असताना समोरून भरधाव वेगात येणार्या कारने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवार २३ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास सालोड (हिरापूर) वळणमार्गावर घडली. सुजित वसंत झांबरे (३८) रा. बरबडी असे मृतकाचे नाव आहे. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले.
सुजित झांबरे मित्रासह देवळी येथील कंपनीतून काम आटोपून एम. एच. ३२ डब्ल्यू. ७५१४ क्रमांकाच्या दुचाकीने घरी परतत होता. वळणमार्ग ओलांडत असताना महामार्गावरून भरधाव वेगात येणार्या एम. एच. १२ यू. ६३५८ क्रमांकाच्या कारने त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकी काही अंतरावर फेकली गेली. या अपघातात सुजित झांबरे याच्या डोयाला गंभीर दुखापत झाली. रतस्त्राव अधिक झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून कारचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, वळणमार्गावर वाढलेला वेग आणि वाहतूक नियमांकडे होणारे दुर्लक्ष यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची तीव्र प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यत करण्यात येत आहे. संबंधित यंत्रणांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.