सिंदी (रेल्वे),
notorious-goon-externed : पोलिस स्टेशन दहेगाव गोसावी हद्दीतील देऊळगाव येथील रहिवासी नरेश मोहिते (३८) याला दोन महिन्यांसाठी तडीपार करण्यात आले आहे. त्याच्यावर दहेगाव, सेवाग्राम, वर्धा शहर, सेलू आदी पोलिस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नरेश मोहिते याच्यामुळे गावात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शयता असल्याने त्याच्यावर महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम ६५ (१) (अ) अन्वये तडीपारीचा प्रस्ताव तयार करून तो उपविभागीय पोलिस अधिकार्यांमार्फत व पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय महसूल अधिकारी यांना पाठविण्यात आला होता. या प्रस्तावावर उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय न्याय दंडाधिकारी दीपक करंडे यांनी शिकामोर्तब केला. या आदेशानुसार नरेश मोहिते याच्यावर दोन महिन्याकरिता हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर त्यास ताब्यात घेऊन दहेगाव पोलिसांनी हद्दीबाहेर नेऊन सोडले. ही कारवाई धमेंद्र तोमर, आनंद भस्मे, ब्रह्मानंद मून, प्रदीप डोंगरे, नितीन डाखोळे, किरण आडे, अनिल चिलगर यांनी केली.