तभा वृत्तसेवा
मारेगाव,
asha-worker : कोरोना काळात कोरोना विषाणूचा प्रभाव रोखण्यासाठी जीवाची पर्वा न करता राष्ट्रीय कार्य म्हणून जीव ओतून केलेल्या कार्याचा शासनाने मान्य केलेला 21 महिन्याचा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी आशा वर्कर आणि गटप्रवर्तकांनी गटविकास अधिकाèयांकडे निवेदनातून केली.
कोरोना काळात अनेकांनी आपले जीव गमावले, काहींनी कुटुंबातील व्यक्ती तर जवळचे नातेवाईकसुद्धा गमावले. याही काळात आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांनी जीवाची पर्वा न करता काम केले. वाढत असलेल्या कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी त्यांनी ग्रामस्तरावर उत्कृष्ट कार्य केले. यांच्या कार्याची दखल अनेकांनी घेतली. तसेच यांना ग्रामपंचायतने प्रोत्साहन भत्ता या कोरोना काळातील 21 महिन्याचे 1000 रुपये प्रमाणे देणे बाकी आहे.
याविषयी या आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांनी वारंवार संबंधीत कार्यालयाशी संपर्क साधला. परंतु यांची कोणीही कसलीही दखल घेतली नाही. ग्रामपंचायत कर्मचाèयांना मात्र हा प्रोत्साहन भत्ता देण्यात आला. परंतु कोरोना काळात प्रत्यक्ष कार्य करणाèया या 106 आशा वर्कर आणि 8 गटप्रवर्तक यांना प्रलंबित असलेला हा प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा, अशी मागणी वंदना बोंडे, वैशाली खिरटकर, मैना राऊत, सुधा मेश्राम, लता डाखरे, गीता जीवणे, पंचफुला वाघमारे, प्रभावती ठाकरे, वैशाली दानखेडे, मंगला एकरे, अरुणा अस्वले यांच्यासहित अनेक आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यावेळी उपस्थित होत्या.