तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
yavatmal-news : जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संस्थेमार्फत मंगळवार, 23 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता नवनिर्वाचित नगरसेवक, वृत्तपत्र वितरक वार्ड क्र. 5 चे आकाश परतेकी तसेच वार्ड 10 चे नीरज वाघमारे, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे स्नेही वार्ड क्र. 16 शेख चांद व वार्ड 17 चे भारत ब्राम्हणकर यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार उत्तर देताना सर्वच सदस्यांनी संस्थेला मदत करण्याची तयारी दाखवली. सत्कार प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष अशोक शिंदे, सचिव किरण कोरडे, मार्गदर्शक मदन केळापुरे, उपाध्यक्ष राजू हनवते, प्रवीण आगलावे, संतोष शिरभाते, धर्मेंद्र मुणोत, किशोर भेदरकर, विजय हनवते, कमलनयन कोठारी, श्रीपाद तोटे, अभिजित ठाकरेंसह मोठ्या प्रमाणात सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन श्रीराम खत्री यांनी केले. आभारप्रदर्शन किरण कोरडे यांनी केले.