तभा वृत्तसेवा
मारेगाव,
wild-boar-crop-damage : तालुक्यातील बुरांडा (ख) शिवारातील शेतकरी ज्ञानेश्वर आनंद सुरतेकर यांच्या शेतातील तुरीचे पीक रानडुकरांनी उद्ध्वस्त केल्याची घटना शनिवारी घडली. सुमारे 3 एकरातील तूर पीक रानडुकरांनी रात्री फस्त केल्याने शेतकèयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
सुरतेकर यांची बुरांडा (ख) शिवारात साडेसात एकर शेती आहे. यावर्षी त्यांनी कपाशी, तूर व गहू अशी मिश्र पिके घेतली होती. मात्र, यंदा झालेल्या संततधार पावसामुळे कपाशीच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यातच रानडुकरांबरोबरच रोह्यांचा उपद्रव वाढल्याने शेतकèयांची अडचण अधिकच वाढली आहे.
रानडुकरांच्या हल्ल्याची माहिती शेतकरी ज्ञानेश्वर सुरतेकर यांनी तत्काळ वन विभागाला दिली असल्याचे सांगितले. मात्र, परिसरात वारंवार होत असलेल्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकरी हतबल झाले असून, शासनाने नुकसानग्रस्त शेतकèयांना तातडीने भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी व ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.