यवतमाळ,
rajshree-patil : माणूस घडण्यात शिक्षणासोबत संस्कार महत्वाचे आहेत. संस्काराशिवाय माणूस घडू शकत नाही. विद्यार्थी हा माणूस म्हणून घडला पाहिजे, असे प्रतिपादन गोदावरी समूहाच्या अध्यक्ष राजश्री हेमंत पाटील यांनी महाराष्ट्र इंग्लिश स्कूल मुळावा आणि पंचकृष्ण कॉलेज मुळावाद्वारा आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात व्यक्त केले.
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल मुळावा आणि पंचकृष्ण कॉलेज मुळावाच्या सांस्कृतिक कार्यक्रम दरम्यान विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तर सांस्कृतिक कार्यक्रम इंद्रधनुष्य 2025 मध्ये विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील संस्कृती संवर्धनासाठी लोककला जोपासणारे सादरीकरण केले. यात गोंधळ, जोगवा, वासुदेव, पोतराज, लावणी, बंजारा नृत्य, क्लासिकल नृत्य, धनगर गीत, शेतकरी गीत, राधाकृष्ण गीत, देशभक्ती गीत सादर करण्यात आले.
इंद्रधनुष्य सांस्कृतिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोदावरी बँकेच्या अध्यक्ष राजश्री हेमंत पाटील होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी अर्थ व बांधकाम सभापती तातू देशमुख, पोफाळीचे ठाणेदार नीलेश शेंबडे, मुळावाचे उपसरपंच संजय देशमुख, पंचकृष्ण महाविद्यालयाचे श्रीकांत हंबीर, डॉ. भास्कर हिंगाडे, वासुदेव झरकर, पंडित पांगारकर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वैश्विक विकास संस्था मुळावाचे अध्यक्ष अजय झरकर यांनी केले. संचालन विद्यार्थ्यांनी तर आभार प्राचार्य दीपा शिंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेच्या आणि महाविद्यालयाच्या कर्मचाèयांनी परिश्रम घेतले.