बेलखेड येथील सरकारी पाणंद रस्ता अखेर मोकळा

    दिनांक :24-Dec-2025
Total Views |
रिसोड,
Belkhed government road, मागील पन्नास वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून बेलखेडा ते रिठदच्या शिवेपर्यंत असलेला सरकारी पाणंद रस्ता अतिक्रमण व इतर कारणामुळे बंद होता. तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांनी हा रस्ता खुला करून दिला असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
 
 
Belkhed government road
मागील पन्नास Belkhed government road वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून बेलखेडा ते रिठदच्या शिवेपर्यंत सरकारी नकाशाप्रमाणे व भूमिलेखाच्या नकाशाप्रमाणे असलेला हा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात होता. हा रस्ता खुला करून देण्यात याव, अशी येथील शेतकर्‍यांची बर्‍याच दिवसापासून मागणी होती. हा रस्ता खुला करून देण्यात यावा, यासाठी सेवा पंधरवड्यात येथील शेतकर्‍यांनी उपोषण सुद्धा केले होते. हा रस्ता गावठाण पासून गट नंबर २२१, २२२, २१७ व २१८ मधून रिठदच्या शिवेपर्यंत आहे. मागील कित्येक वर्षापासून या रस्त्यावर अतिक्रमण झाले होते. काही ठिकाणी तर हा रस्ता वहिती करण्यात आला होता. त्यामुळे या शिवारातील शेतकर्‍यांना शेतात जाणे येणे करण्यासाठी व शेतमाल घरी आणण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. तसेच हा रस्ता बेलखेडा ते रिठद या दोन गावांना जोडणारा रस्ता आहे. बेलखेडा हे संत्रा उत्पादक गाव म्हणून ओळखले जाते. हा रस्ता बंद असल्यामुळे शेतकर्‍यांना संत्रा तसेच शेतमाल घरी आणण्यासाठी मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता. महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख व कार्यक्षम गतिमान व पारदर्शक करण्याच्या हेतूने यावर्षी महाराष्ट्र शासनाने छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानांतर्गत सेवा पंधरवडा राबविला होता. या अभियानात पाणंद रस्ते विषयक मोहीम मोठ्या प्रमाणात हाती घेण्यात आली होती. त्या अनुषंगाने तहसीलदार तेजनकर यांनी तालुयातील पाणंद रस्ते मोकळे करून देण्यावर अधिक भर दिला.
बेलखेड येथील हा रस्ता गाव ठाण्याच्या नकाशावर तसेच भूमि अभिलेखाच्या नकाशावर स्पष्टपणे दिसत होता. तसेच शेतकर्‍यांची बरेच दिवसापासून मागणी असल्यामुळे तहसीलदार यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला मोजणीचे आदेश देऊन पोलिस संरक्षणात हा रस्ता खुला करून दिला आहे. हा रस्ता मोकळा झाल्यामुळे शेतकर्‍यांची कायमची समस्या मिटली असून, शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.