घृणास्पद...कुत्र्याला मारले आणि सशाचे मांस म्हणून विकले!

    दिनांक :24-Dec-2025
Total Views |
मोतिहारी,
Dog meat was sold as rabbit meat बिहारमधील मोतिहारी जिल्ह्यातील गढिया गावात घृणास्पद घटना उघडकीस आली आहे. दारू खरेदीसाठी पैसे नसल्यामुळे एका तरुणाने कुत्र्याला मारून त्याचे मांस सशाचे असल्याचे सांगून गावात विकले. मंगरू साहनी नावाच्या या तरुणावर आरोप आहे की त्याने कुत्र्याचे मांस प्रति किलो १,००० रुपयांच्या दराने विकले आणि मिळालेले पैसे दारू खरेदीसाठी वापरले.
 

dog स्ट्रीट 
मधुबन ब्लॉकमधील गढिया बाजार पोलिस स्टेशन हद्दीतील या घटनेमुळे परिसरात कुत्र्याचे मांस गावकऱ्यांना विकले. या मांसामुळे अनेक लोक आजारी पडल्याचे समोर आले आहे. गावकांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल करून आरोपीवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. सध्या मंगरू फरार असून, घराजवळील बागेत कुत्र्याचे कापलेले डोके आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटना पोलिसांच्या तपासाखाली आहे आणि स्थानिक प्रशासन या गंभीर प्रकरणात तातडीने कारवाई करत आहे.