5 लाखांची लाच स्वीकारताना जीएसटी अधिकारी अटकेत

    दिनांक :24-Dec-2025
Total Views |
मुंबई,
Mumbai GST raid केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) ने मुंबईतील केंद्रीय वस्तू व सेवा कर (CGST) कार्यालयातील एका वरिष्ठ अधीक्षकाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. एका खासगी कंपनीच्या संचालकाकडून पहिल्या हप्त्याचे 5 लाख रुपये लाच स्वीकारताना या अधिकाऱ्याला रंगेहात पकडण्यात आले.
 

Mumbai GST raid 
माहितीनुसार, तक्रारदाराच्या कंपनीच्या ऑडिट दरम्यान संबंधित जीएसटी अधिकाऱ्याने सांगितले की कंपनीने 98 लाख रुपयांचा कर बुडवला आहे. प्रकरण मिटवण्यासाठी अधिकाऱ्याने सुरुवातीला 20 लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर तडजोडीनंतर 17 लाख रुपयांची रक्कम ठरवण्यात आली होती. तक्रारदाराने या भ्रष्टाचाराची माहिती CBIला दिली आणि 22 डिसेंबर रोजी सापळा रचून कारवाई करण्यात आली.घराबाहेरच्या छाप्यात 18 लाख 30 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली, तर आरोपीच्या मालमत्तेच्या कागदपत्रांनुसार एप्रिल 2025 मध्ये 40 लाख 30 हजार आणि जून 2024 मध्ये 32.10 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता खरेदी झाल्याचे आढळले. याशिवाय, कार्यालयातील छाप्यात कंपनीच्या ऑडिट अहवालाशी संबंधित डिजिटल पुरावे आणि संशयास्पद कागदपत्रेही जप्त करण्यात आली आहेत.
 
 
या प्रकरणामुळे मुंबईतील जीएसटी विभागात मोठी खळबळ उडाली असून, CBI अधिकारी अधिकाऱ्याने आणखी किती कंपन्यांना लाच घेतली असावी याचा सखोल तपास करत आहेत.