गोळीबाराने हादरले नागपूर ...गुमगावमध्ये प्राध्यापकसह तिघे जखमी

    दिनांक :24-Dec-2025
Total Views |
नागपूर,
Nagpur was shaken shooting बुधवारी सकाळी नागपूर हादरवून टाकणारी गोळीबाराची घटना घडली. हिंगणा तालुक्यातील गुमगाव परिसरात घरगुती वादाने हिंसक वळण घेतले आणि रागाच्या भरात एका व्यक्तीने बंदूक उचकटून प्राध्यापकासह दोन जणांना अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात तिघे जण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती अशी की, सकाळी सुमारे ८ वाजता गुमगाव परिसरात गज्जू नावाच्या व्यक्तीचा देवतळे कुटुंबाशी जुना घरगुती वाद होता. या वादाचे परिणाम म्हणून गज्जूने थेट बंदूक काढून प्राध्यापक नितीन देवतळे, प्रविण देवतळे आणि त्यांच्या सोबतीच्या एका मित्रावर दोन राऊंड फायरिंग केली.
 
 
Nagpur shooting
 
जखमींना तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. भरदिवसा आणि गावच्या गर्दीत घडलेल्या या हल्ल्यामुळे संपूर्ण गुमगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीण पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि आरोपी गज्जूच्या कारवाईवर तपास सुरू केला आहे. पोलिस आरोपीने इतक्या तिव्रतेने पाऊल का उचलले आणि त्याच्याकडे शस्त्र कोठून आले, याचा शोध घेत आहेत.