मुंबई,
Sanjay Raut महाराष्ट्राच्या राजकारणात धक्कादायक निर्णयाची तयारी सुरू आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मुंबई महापालिका निवडणुकीत एकत्र लढण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितले की, अनौपचारिकरीत्या युतीची माहिती दिली गेली असून, अधिकृत घोषणा लवकरच केली जाणार आहे. राऊत म्हणाले, “उद्धव आणि राज ठाकरे यांचा हा संयोग मराठी माणसासाठी ऐतिहासिक दिवस आहे. हा दिवस संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणेच्या दिवसासारखा महत्वाचा आहे.”
राऊत यांनी शिवसेना विरोधकांवर जोरदार टीका केली. शहरातील काही भागांमध्ये ‘बाटोगे तो पीटोगे’ असे पोस्टर्स लावल्याची बाब त्यांनी शिंदे आणि भाजप पक्षाचे कुटील कारस्थान असल्याचे म्हटले. ते म्हणाले की, मुंबईतील प्रत्येक नागरिकाचा समावेश आहे आणि मराठी माणसाला एकत्र आणण्याच्या प्रयत्नांना काहींना आवडत नसल्यामुळे द्वेष पसरवला जात आहे.संजय राऊत यांनी शिंदे आणि फडणवीस यांच्यावर आरोप केला की, गेल्या दोन वर्षांत मराठी माणसासाठी त्यांनी आवाज उठवला नाही. “गेल्या दोन वर्षांत आमच्या मराठी लोकांना मारहाण झाली, महाराष्ट्राचे झेंडे लावल्याबद्दल 212 लोकांना तुरुंगात टाकण्यात आलंय. परंतु शिंदे किंवा फडणवीसांनी त्यासंदर्भात निषेध नोंदवलेला नाही,” असे राऊत म्हणाले.
त्यांनी पत्रकारांच्या Sanjay Raut प्रश्नांना उत्तर देताना भाजपावर टीका करत म्हटले की, 1992 मध्ये बाबरी मशीद पाडल्यानंतर भाजप घरात बसले होते, तर त्यावेळी शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. राऊतांनी शरद पवार यांच्याशी सकारात्मक चर्चा झाल्याचे सांगितले आणि युती निश्चित होण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट केले.राऊत म्हणाले, “हा शाप मराठी माणसाला लागलेला आहे; छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते पाहायला मिळते. आमच्या आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनाही महाराष्ट्रीयांनी तीव्र विरोध केला होता, तरीही त्यांनी पुढे जाऊन शिवसेना स्थापन केली.”