काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक यांचे निधन

    दिनांक :24-Dec-2025
Total Views |
नंदुरबार,
Surupsingh Naik has passed away महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून दुःखद बातमी समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आणि माजी खासदार सुरुपसिंग नाईक यांचे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. वयाच्या ८८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या या अकाली निधनाने काँग्रेससह नंदुरबारच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. सुरुपसिंग नाईक हे १९८१ ते २०१९ पर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय राहिले. त्यांनी इंदिरा गांधी आणि गांधी परिवारासोबत अत्यंत जवळचे नाते राखले होते आणि विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात होते. नाईक यांनी नवापूर सारख्या आदिवासी बहुल भागात शैक्षणिक संस्थांचे मोठे जाळे उभारले आणि आदिवासी युवकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे काम केले. तसेच एमआयडीसीची स्थापना करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या, कृषी उत्पन्न बाजार समिती आणि शेतकी संघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली.
 
 

nidhan 
 
 
सुरुपसिंग नाईक Surupsingh Naik has passed away यांची राजकीय कारकीर्दही प्रभावशाली होती. १९७२ ते १९८१ पर्यंत ते नंदुरबार लोकसभा मतदारसंघाचे खासदार होते. १९८१ मध्ये त्यांनी खासदारकीचा राजीनामा देऊन राज्याच्या राजकारणात प्रवेश केला आणि आदिवासी विकास, समाज कल्याण, वन, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन आणि परिवहन या विभागांचे मंत्री म्हणून कार्य केले. १९८२ ते २००९ पर्यंत ते सलग महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य राहिले. २००९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव झाला, मात्र २०१४ मध्ये नवापूर विधानसभा मतदारसंघातून पुन्हा विजयी झाले. २०१९ मध्ये त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली आणि मुलगा शिरीष कुमार नाईक यांना नवापूर विधानसभा मतदारसंघाचा आमदार म्हणून पुढे आणले. सुरुपसिंग नाईक यांच्या निधनाने नंदुरबारमधील राजकीय वर्तुळात आणि काँग्रेसमध्ये एक मोठा रिक्तपणा निर्माण झाला आहे. त्यांच्या कार्याचा आदर आणि योगदान अनेक वर्षांपर्यंत स्मरणात राहणार आहे.