बांगलादेशच्या 'राष्ट्रपिता'पेक्षा मोठा झाला उस्मान हादी!

    दिनांक :24-Dec-2025
Total Views |
ढाका,
Usman Hadi became greater बांगलादेशमध्ये माजी पंतप्रधान शेख हसीनाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थी नेते उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर देशात धक्कादायक घटना घडली आहे. ढाकातील विद्यापीठात बंगबंधू शेख मुजीबुर रहमान हॉलचे नाव बदलून "शहीद शरीफ उस्मान हादी हॉल" असे ठेवण्यात आले आहे. या निर्णयामुळे बांगलादेशचे "राष्ट्रपिता" आणि बंगबंधू म्हणून ओळखले जाणारे शेख मुजीबुर रहमान यांचे स्थान त्या हॉलमध्ये उस्मान हादींपेक्षा कमी झाले आहे, असे म्हटले जात आहे.
 
 

बांगलादेशच्या  
माहितीनुसार, १२ डिसेंबर रोजी ३२ वर्षीय उस्मान हादी यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळी झाडली होती आणि १८ डिसेंबरला सिंगापूरमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हादी यांना शहीद घोषित करण्यात आले आहे. त्यांच्या मृत्यूनंतर ढाकाच्या विद्यापीठातील विद्यार्थी संघटनेने हॉलच्या मुख्य प्रवेशद्वारावरील जुने नेमप्लेट काढून टाकले आणि नवीन नेमप्लेट बसवला. यावर "शहीद शरीफ उस्मान हादी हॉल" असे लिहिलेले आहे.
 
याचवेळी, हॉलच्या मुख्य इमारतीवरील बंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या भित्तिचित्रावर रंग भरल्याचेही पाहायला मिळाले. ढाका युनिव्हर्सिटी सेंट्रल स्टुडंट्स युनियनचे सांस्कृतिक कार्य सचिव मुसद्दीक इब्न अली मोहम्मद यांनी रात्री क्रेनच्या मदतीने नेमप्लेट काढण्याची घोषणा केली. रात्री ९:४५ वाजता हॉलचे नाव पुसण्याचे काम सुरू झाले आणि ११:१५ वाजता भित्तिचित्रावर रंग भरला गेला. हॉल कौन्सिलच्या उपाध्यक्ष मुस्लिमुर रहमान यांनी माध्यमांना सांगितले की, विद्यार्थ्यांनी नाव काढण्याची मागणी केली होती, त्यामुळे आम्ही त्यांच्या निर्णयावरून ते काढून टाकत आहोत. या घटनांनी संपूर्ण बांगलादेशात मोठा गदारोळ निर्माण केला असून, देशात हल्ले आणि तोडफोडींची घटना उडाल्याची माहिती आहे.