अकोला,
Akola municipal elections, महापालिका निवडणुकीच्या पृष्ठभूमीवर वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली आहे. दरम्यान काँग्रेसकडून युती संदर्भात कोणातही प्रस्ताव अद्याप पर्यंत आला नसून भाजप वगळता इतर पक्षांचा प्रस्ताव आल्यास विचार करू अशी माहिती प्रदेश संघटक अँड नातिकोद्दीन खतीब यांनी बुधवार, २४ रोजी स्थानिक यशवंत भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.
अकोला महापालिकेच्या Akola municipal elections २० प्रभागातून ८० जागांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी २३ डिसेंबर पासून उमेदवारी अर्ज देखील दाखल करण्याला सुरुवात झाली आहे.दरम्यान राजकीय पक्षांचे युती व आघाडी संदर्भात अद्याप पर्यंत भिजत घोंगडे असल्याची वस्तुस्थिती आहे.मात्र वंचित बहुजन आघाडीने यातून मार्ग काढत पहिली पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. याशिवाय काँग्रेसची युती होण्यासंदर्भात खतीब म्हणाले की, अँड आंबेडकर काल दिवसभर अकोल्यात होते मात्र वरिष्ठ व स्थानिक पातळीवरून युती संदर्भात कोणताही प्रस्ताव आला नाही.याशिवाय भाजप वगळता अन्य राजकीय पक्षांचा प्रस्ताव आलाच तर जाहीर केलेल्या जागा वगळून इतर जागांचा विचार करू असेही खतीब म्हणाले.यावेळी पत्रकार परिषदेला ओबीसी नेते बालमुकुंद भिरड, दामोदर जगताप, निलेश देव, गजानन गवई, आकाश सिरसाट, अझहर खान, अँड संतोष राहाटे, वंदना वासनिक, सुवर्णा जाधव, पराग गवई आदी उपस्थित होते.
जाहीर केलेले उमेदवार व प्रभाग
प्रभाग ७ अ- (अ.जा.) किरण महेंद्र डोंगरे
प्रभाग ७ ड (सर्वसाधारण) महेंद्र देविदास डोंगरे
प्रभाग ९ अ (अ.जा) चंदू शिरसाट
प्रभाग ९ ब (नामाप्र, महिला) नाज परवीन शेख वसीम
प्रभाग ९ क (सर्वसाधारण) शमीम परवीन,कलिम खान पठाण