वर्धा,
wardha-khokho-maharashtra सहयोग शिक्षण प्रसार मंडळद्वारा स्व. प्रदीप महाजन व स्व. वसंत कोकाटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुरुष व महिलांसाठी विदर्भ राज्यस्तरीय खो-खो स्पर्धा २६ ते २८ डिसेंबरदरम्यान स्थानिक जुने आरटीओ मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत विदर्भातील महिला व पुरुषांच्या २३ चमूंची नोंदणी झाली असल्याची माहिती सहयोग शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष अतुल तराळे यांनी आज २४ रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
wardha-khokho-maharashtra स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार २६ रोजी सायंकाळी ६ वाजता होईल. या स्पर्धेत विदर्भातील १३ पुरुष संघ आणि १० महिला संघ सहभाग घेणार आहे. ५० राष्ट्रीय पंच अधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. स्पर्धेसाठी १०० कार्यकर्ते सहकार्य करीत आहेत. खेळाडूंच्या तीनही दिवसाची निवास व्यवस्था शिववैभव मंगल कार्यालय, बॅचलर रोड येथे करण्यात आली आहे.
wardha-khokho-maharashtra पुरुष विभागासाठी प्रथम पुरस्कार ३१ हजार व चषक, द्वितीय पारितोषिक २१ हजार व चषक, तृतीय पारितोषिक ११ हजार व चषक, महिला विभागासाठी प्रथम पारितोषिक २१ हजार व चषक, द्वितीय पारितोषिक १५ हजार रोख व चषक, तृतीय पारितोषिक ७ हजार रोख व चषक देण्यात येणारा आहे. याशिवाय प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडू, मालिका वीर, अष्टपैलू खेळाडूंना भेट वस्तू देण्यात येईल. प्रत्येक सामन्यातील उत्कृष्ट खेळाडूला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात येईल. अंतिम सामन्यातील उत्कृष्ट आक्रमक खेळाडू, संरक्षक व अष्टपैलू खेळाडूला मालीकावीर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
wardha-khokho-maharashtra या स्पर्धेत विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धेसह महिला व पुरुषांचे २३ संघांनी नोंदणी केली असल्याची माहितीही त्यांनी दिली. समारोप रविवार २८ रोजी सायंकाळी होणार असल्याचे ते म्हणाले. सन १९८५ पासुन खो खो खेळाचा सराव येथे करण्यात येत आहे. यावर्षीची ८ वी बॅच आहे. येथे सराव करणारे खेळाडू पोलिस विभागासह अनेक ठिकाणी खेळ या कोट्यातून नोकरीला लागले असल्याची माहिती त्यांनी दिली. पत्रकार परिषदेला डॉ. यशवंत हिवंज, प्रशांत पांडे, नरेंंद्र दिघडे आदी उपस्थित होते.