बांग्लादेशातील हिंदूंवरील हिंसाचार विरोधात विहिंपचे निदर्शने

wardha-vhp-hindu अल्पसंख्यक हिंदूंवरील अत्याचाराचा तीव्र निषेध

    दिनांक :24-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
 
wardha-vhp-hindu बांग्लादेशातील हिंदू समुदायावरील हिंसाचाराच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद (विहिंप) आणि बजरंग दलाच्या संयुक्त वतीने आज बुधवार २४ रोजी शिवाजी चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी हिंदू संघटनांचे अधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बांग्लादेशातील अल्पसंख्यक हिंदूंवरील अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यात आला आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. आंदोलकांनी घोषणाबाजी करून निषेध नोंदवला.
 
 
 
wardha-vhp-hindu
 
 
wardha-vhp-hindu यावेळी संजीव लाभे, विहिंप वर्धा सहमंत्री शरद कोणप्रतिवार, अरविंद कोकाटे, जिल्हा प्रभारी मुन्ना यादव, बजरंग दल जिल्हा समन्वयक महेश राऊत, समन्वयक अमोल आतकर, जिल्हा विद्यार्थी प्रमुख अंबुज पांडे, जिल्हा गोरक्षक प्रशांत यादव, प्रचार प्रमुख चेतन लड्ढा, शहर समन्वयक किरण उपाध्याय, दुर्गा वाहिनीच्या जिल्हा समन्वयक पूनम भोयर, जिल्हा समन्वयक अश्विनी ठाकूर, शहर समन्वयक स्वाती दोडके, रविकांत बडवई, मोनू तिवारी, प्रथम यादव, गोविंद पांडे, यश पांडे, कुणाल भोयर, यांच्यासह विविध हिंदूत्ववादी संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.