यवतमाळ,
electricity supply वीज ही अत्यावश्यक सेवा असूनही परिमंडळातील हजारो वीजग्राहक वीजबिल भरण्यास चालढकल करतात. त्यामुळे नाईलाजास्तव महावितरणला धडक मोहिम घेत कारवाई सुरू करावी लागली. महावितरणच्या कारवाईत 39 कोटी 53 लाख रूपयाच्या थकबाकीसाठी परिमंडळातील लघुदाब वर्गवारीतील घरगुती, वाणीज्यिक औद्योगिक आणि इतर वर्गवारीतील 33 हजार 845 वीज ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
महावितरण ही electricity supply वीज निर्मिती करणाèया कंपन्यांची एक ग्राहक असल्याने वेळेत देयके अदा करण्यासाठी प्रत्येक महिन्याचे वीजबिल 100 टक्के वसूल होणे क्रमप्राप्त आहे. परंतू हजारो वीजग्राहक वीजबिल भरण्यास प्राधान्यच देत नाही. शिवाय महावितरणचे कर्मचारीही प्रतिसाद देत नसल्याचे दिसून येते. परिणामी परिमंडळात दिवसेंदिवस महावितरणच्या थकबाकीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. डिसेंबर महिन्याचे 22 दिवस संपूनही वीजबिलाची वसूली डिसेंबर महिन्याच्या डिमांडच्या 62 टक्के आणि एकूण थकबाकीच्या 28 टक्के झाली. त्यामुळे मुख्य अभियंता अशोक साळुंके यांनी वसूलीबाबत विभागनिहाय आढावा घेऊन थकीत वीजबिलाच्या वसूलीसोबत थकबाकीदार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे उद्दिष्ट ठरवून दिले आहे. वीजपुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या कर्मचाèयांनी कारवाईच करावी आणि त्याची नोंद ऑनलाईन पोर्टलमध्ये करावी, अशा स्पष्ट सूचना मुख्य अभियंत्यांनी दिल्या आहेत.
ऑनलाईन नोंद झाल्यास ग्राहकांना भरावा लागणार पुनर्जोडणी शुल्काचा भुर्दंड
वीज पुरवठा खंडित केल्यानंतर त्या ग्राहकाची नोंद ऑनलाईन केल्यानंतर, सुरक्षा ठेवीसह संपूर्ण थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय त्या थकबाकीदार ग्राहकाचा वीज पुरवठा पुर्ववत करता येत नाही.सिंगल फेज ग्राहकांना भुर्दंड म्हणून 310 आणि थ्री फेज ग्राहकाला 530 रूपयाचे पुनर्जोडणी शुल्क आकारण्यात येते.
33 हजार 845 ग्राहकाचा वीजपुरवठा खंडित
थकबाकीला प्रतिसाद न देणाèया परिमंडळातील 33 हजार 845 ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला असून यात अमरावती जिल्ह्यातील 11 हजार 992 आणि यवतमाळ जिल्ह्यातील 21 हजार 853 ग्राहकाचा समावेश असून त्यांच्याकडे अनुक्रमे 12 कोटी 79 लाख आणि 26 कोटी 74 लाख रूपये वीजबिलाचे थकीत आहे.
वीजबिल वसुलीत अमरावती परिमंडळ शेवटून तिसरे
राज्यात महावितरणचे 16 परिमंडळ आहेत. परंतू वीजबिल वसूलीबाबत अमरावती परिमंडळांचा चौदावा क्रमांक लागतो. वीजबिल वसुलीतील उदासीनता महावितरणसाठी चिंता निर्माण करणारी असल्याने, महावितरणला नाईलाजास्तव वीजपुरवठा खंडित करण्यासारख्या मोहिमेला सामोरे जावे लागते आहे.