तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
akshara bharsakhale हातगाडीवर फळे विकणारा लोहारातील शिवाजीनगरातील रहिवासी नीलेश भारसाखळे यांच्या मुलगी अक्षरा हीने कठीण परिस्थितीत हॉकी खेळात राष्ट्रीय स्तरावर भरारी घेतली आहे. अक्षरा भारसाखळे आता महाराष्ट्र राज्य मुलीच्या हॉकी संघात प्रतिनिधित्व करणार आहे. तीचे वडील नीलेश व आई दीपाली यांनी आपल्या कन्येने हॉकी खेळात प्रगती करावी म्हणून श्रीसाई माध्यमिक विद्यालयात तीचा प्रवेश करून दिला. नियमित सरावासोबत आपल्या तुटपुंज्या मिळकतीतून सुविधा देऊन अक्षराला प्रोत्साहन दिले.
अक्षरानेही आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले. अखेर चौदा वर्षांआतील शालेय राज्य हॉकी स्पर्धेत या कौशल्यवंत हॉकीपटूची निवड राष्ट्रीय हॉकी स्पर्धेकरिता महाराष्ट्र राज्य मुलींच्या संघात झाली. 69 व्या शालेय राष्ट्रीय मुलींचा हॉकी स्पर्धा मध्यप्रदेश राज्यातील ग्वालियर येथे 1 ते 7 जानेवारी दरम्यान होत आहे. अक्षराला शाळेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब इंगोले, माजी मुख्याध्यापक मनोज इंगोले, मुख्याध्यापक अजय भटकर, आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आकाश चिकटे व शारीरिक शिक्षण शिक्षक व क्रीडा शिक्षक जितेंद्र सातपुते यांचे मार्गदर्शन मिळत आहे.akshara bharsakhale अक्षरा आपल्या यशाचे श्रेय आईवडील, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड, जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे अध्यक्ष तथा प्राचार्य मनोज येंडे, सुशील कोठारी, क्रीडाधिकारी चैताली राऊत, क्रीडा अधिकारी सचिन हरणे, डॉ. सुरेंद्र भुयार, डॉ. संतोष भोसले, डॉ. धीरज बत्रा, वनदेव माघाडे, विजय चौधरी, अभय दुधाटे, अर्चना डहाके, जयश्री देशमुख, वैशाली शहाडे, किशोर यादव, रवी उईके, हॉकीपटू विकी गिरी, प्रथमेश ठोकळ यांना देते.