अ. भा. ग्राहक पंचायत दारव्हा शाखेची वार्षिक सभा

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
दारव्हा,
panchayat darwha branch ग्राहक पंचायतची वार्षिक सभा ज्येष्ठ नागरिक मंडळाच्या सभागृहात 23 डिसेंबरला दुपारी 3 वाजता घेण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन, हारार्पण व दीपप्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दारव्हा ग्राहक पंचायतचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र ठाकूर होते. त्यांनी राष्ट्रीय ग्राहकदिन तसेच समाजात ग्राहक चळवळीबाबत जागृती निर्माण करण्यासाठी योग्य नियोजन करणे गरजेचे असल्याचे सांगितले. याकरीता सभासदांनी समाजात सतत कार्यरत राहावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
 
 
sabha
 
 
 
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्राहक पंचायतचे सचिव अंबादास धामोरे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी वर्षभरातील ग्राहकांच्या विविध प्रकारच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न करून अनेक समस्या सोडवल्याचे सांगितले. आजचा युवक ग्राहक भविष्यातील प्रौढ ग्राहक जागृत व्हावा, या उद्देशाने शाळा, महाविद्यालयात राष्ट्रीय ग्राहकदिन व जागतिक ग्राहकदिन साजरा करण्यात येत असल्याचे धामोरे यांनी सांगितले.panchayat darwha branch याप्रसंगी डॉ. कांचन नरवडे, राजेंद्र चिंतकुंटलावार, श्याम पांडे यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी सभासदांनी उपस्थित केलेल्या प्रश्नास समाधानकारक उत्तरे देण्यात आली. शेवटी मोतीलाल बजाज यांनी सर्वांचे आभार मानले.