अमरावती,
atal-daud : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त गुरुकुल बहुद्देशीय शिक्षण संस्था व अमरावती जिल्हा अॅथलेटिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने अटल दौड राज्यस्तरीय हाफ मॅरेथॉन स्पर्धेत गुरुवारी सकाळी हजारो स्पर्धक धावले. त्यामध्ये पुरुष गटातून राज तिवारी यांना बीएम टीव्हीएस स्पोर्ट तर महिला गटातून साक्षी जडयाल हिला टीव्हीएस ज्युपिटर दुचाकी पुरस्कार म्हणून देण्यात आली.
स्पर्धेत राज्यभरातून २१६४ धावपटूंनी सहभाग घेतला. स्थानिक दसरा मैदान येथे स्पर्धेला सकाळी सहा वाजता सुरूवात झाली. स्पर्धेमध्ये २१ किलोमीटर, १० किलोमीटर, ८ किलोमीटर, ५ किलोमीटर आणि ३ किलोमीटर व रन फॉर अमरावती खुला गट अशा शर्यती पार पडल्या. या स्पर्धेमध्ये अमरावती शहरातील विविध संघटनांनी सहभाग नोंदवला. यावेळी मुख्य आयोजक तुषार भारतीय, खा. डॉ. अनिल बोंडे, निवेदिता चौधरी, माजी महापौर चेतन गावंडे, अॅथलेटिक्स संघटनेचे सचिव प्रा. अतुल पाटील, ऋषी खत्री, प्रशांत शेगोकार, सचिन मोहोड, डॉ. श्याम राठी, डॉ. मिलिंद पाठक यांनी झेंडा दाखवून सुरूवात केली.
स्पर्धेअंती सर्व गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, प्रमाणपत्र व मेडल प्रदान करण्यात आली. स्पर्धकांसाठी अल्पोपराची व वैद्यकीय सेवेची व्यवस्था करण्यात आली होती. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सचिन मोहोळ, तुषार चौधरी, निरंजन दुबे, राम शेगोकर, मंदार नानोटी, शुभम वैष्णव, भूषण हरकूट, कार्तिक नाचनकर, सौरभ कालबांडे, गोपाळ दलाल, सुधीर पावडे, आकाश वाघमारे, सुरज जोशी, योगेश निमकर, जयेश गायकवाड, घवहळ देशपांडे, सौरभ वडुरकर, योगेश उघडे, राजेश जगताप, बंडू विघे यासह अनेकांनी परिश्रम घेतले.
अटल दौड हाफ मॅरेथॉन स्पर्धा दरवर्षी विविध गटांमध्ये आयोजित करण्यात येते.
स्पर्धेच्या विविध गटातील विजेते
महिला २१ किमी : साक्षी जड्याल, रविना गायकवाड, स्वाती पचबुद्धे, दिव्या जाधव, मैत्री ढोणके, भारती जयस्वाल. पुरुष २१ किमी : राज तिवारी, राजन यादव, लीला राम, गौरव पवार, शंकर नांदे, कृष्णकांत राखोंडे. १४ वर्षा आतील मुली : यशस्वी राठोड, ईश्वरी काळमेघ, नंदिनी सावरकर, स्वरा लांधे, हर्षिता मांढरे, कार्तिकी घरपाले. १४ वर्षाआतील मुले : कपिल हटकर, यश बागवे, प्रद्युम्न राऊत, आर्यन पिंपळकर, सुमित चव्हाण, सुमित मेंढे. १६ वर्षाआतील मुली : लावण्या नगरकर, नव्या चिताडे, सालीया खान, संस्कृती पालसपगार, मनस्वी कुंजरपगार, ऐश्वर्या परसखेडे. १६ वर्षाआतील मूल : रितेश राठोड, अजय राठोड, अभय इंगळे, शिवम बुंदे, संयम महाले, आकाश ठाकरे. १० किमी महिला : प्रियांका ओकसा, प्राजक्ता गोडबोले, प्रगती जाधव, प्रणाली शेगोकर, पूजा पंचबुद्धे, अभिलाषा भगत. १० किमी पुरुष : दाजी हुबाळे, ईश्वर झिखाड, अब्दुल बर्डे, रोहित झा, अनिल जाधव, सचिन खोरणे. ४० वर्षावरील महिला : प्रमिला लांबकाने, कविता आडे, मीनाक्षी जायले, शोभा मानकर, शुभांगी आखरे, मीना हाडके, ४० वर्षावरील पुरुष : अर्जुन सालने, भास्कर कांबळे, प्रमोद उरकुडे, सुभाष चिमनकर, उमेश इंगळे, ज्ञानेश्वर गोरडे. २० वर्षाआतील मूल : वैभव शिंदे, अनिकेत जंगले, आकाश शिंदे, विवेक भगत, जयरवींद्र पवार, महेश शेलार २० वर्षाआतील मुली : मीनाक्षी खरपटे, चैताली बोरेकर, ऋतिका नंदनवार, स्नेहा चौधरी, जानवी राझोडे, गायत्री बेहरे.
रन फॉर अमरावती गटात : कृष्णा योगी, अनुराग काळपांडे, श्रेयस सोनोने, संजय पटेल, विशाल भिलायकर, रामविलास परते.