मी विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करतोय!

नाशिकमध्ये मनसेच्या महत्त्वाचा नेता भाजपच्या मार्गावर

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
नाशिक,
BJP for development - Dinkar Patil राजकारणात सकाळपासून धक्कादायक घडामोडी सुरू आहेत. काल मुंबईत वरळीच्या ब्लू सी हॉटेलमध्ये मनसे आणि उद्धव ठाकरे शिवसेना युतीची घोषणा झाली होती. या युतीनंतर नाशिकमध्ये आज सकाळपासून ‘ऑपरेशन लोट्स’ सुरु झाले असून ठाकरे गटाच्या पक्षाला भाजपकडून मोठा धक्का बसत आहे. आज सकाळी विनायक पांडे आणि यतीन वाघ यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर केला, मात्र त्यांच्या पक्षप्रवेशाला भाजपकडून विरोध दर्शवला जात आहे. त्यामुळे नाशिक भाजप कार्यालयाबाहेर हाय वोल्टेज ड्रामा सुरू आहे. याच दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एक मोठा नेता दिनकर पाटील भाजपमध्ये प्रवेश करत असल्याची माहिती मिळाली आहे.
 
 

दिनकर पाटील 
दिनकर पाटील यांना ‘तुम्ही मनसे का सोडत आहात? कोणावर नाराज आहात का?’ असे विचारले असता त्यांनी उत्तर दिले, “मी कुठेही नाराज नाही. मी विकासासाठी भाजपमध्ये प्रवेश करतोय. राज ठाकरे यांना माझा राजीनामा पाठवला आहे. मनसेच्या कोणत्याही माणसावर नाराजी नाही.” दिनकर पाटील मूळचे भाजपचे सदस्य आहेत. लोकसभेच्या काळात त्यांनी पक्ष सोडला होता, विधानसभेला राज ठाकरे यांनी त्यांना मनसेकडून उमेदवारी दिली होती. आता महापालिका निवडणुकीच्या वेळी ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करत आहे
 
दिनकर पाटील मनसे सोडून भाजपमध्ये प्रवेश करत असून, त्यांच्या सोबत तीन नगरसेवकही आहेत. कालपर्यंत ते नाशिक महापालिका निवडणुकीसाठी मनसेच्या संभाव्य उमेदवारांच्या मुलाखती घेत होते. राज ठाकरे यांनी त्यांच्यावर मोठा विश्वास ठेवला होता, पण आज ते भाजपकडे गेले आहेत. विनायक पांडे, जे 43 वर्ष शिवसेनेत होते आणि फुटल्यानंतर उद्धव ठाकरे गटासोबत राहिले, त्यांनीही तडकाफडकी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.