रक्तदान करून अटलजींना अभिवादन

नवनिर्वाचीत अध्यक्षांचा व सदस्यांचा सत्कार

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
अचलपूर,
blood-donation : भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त अचलपूर व परतवाडा शहरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. रक्तदान शिबिर, अटल स्मृती संमेलन, स्मृती प्रदर्शनी व नवनियुक्त नगराध्यक्षांचा व नगरसेवकांचा सत्कार सोहळा गुरूवारी उत्साहात झाला. यावेळी आ. प्रवीण तायडे, आ. केवळराम काळे व भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रभुदास भिलावेकर उपस्थित होते.
 
 
blood donation
 
प्रमुख वक्ता गजानन कोल्हे म्हणाले की, देशात अटल बिहारी वाजपेयी जन्मशताब्दी वर्ष हे सुशासन दिवस म्हणून साजरे होत आहे. भारतीय जनता पक्षाचे हे आधुनिक रूप आहे. जनसंघाचे वेळी दिवा या चिन्हापासून राजकीय सुरुवात झाली होती. आज कमळ आपल्या हाती आले आहे. यामागे अनेक नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम, बलीदान आहे. भारतीय जनता पार्टीचे आताचे रूप हे आधुनिक रूप आहे. त्या मागचा इतिहास आजच्या युगाच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकार्यापर्यंत पोहोचणे गरजेचे असल्यामुळे जन्मशताब्दी वर्ष सुशासन दिवस म्हणून साजरे करण्यात येत आहे .
 
 
यावेळी नवनियुक्त नगराध्यक्ष रूपाली माथने, अंजनगावचे नगराध्यक्ष अविनाश गायगोले, धारणी नगरपंचायत अध्यक्ष सुनील चौथमल, नगरसेवक चंद्रेश बहोरिया, दुर्गा विवेक सोनपरोते, अक्षरा लहाने, पद्मिनी बेंडे, सुरेंद्र तांबे तसेच चांदूर बाजार व अंजनगाव सुर्जी येथील नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते झाला.
 
 
//नगराध्यक्षांसह कार्यकर्त्यांचे रक्तदान
 
 
यावेळी मोती मंगल कार्यालय परतवाडा येथे आयोजित रक्तदान शिबिरमध्ये अचलपूरच्या नवनियुक्त नगराध्यक्ष रुपाली माथने यांनी प्रथम रक्तदान करत अटलजींना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी गजानन कोल्हे यांच्यासह १०० कार्यकर्त्यांनी रक्तदान करत अटलजींना अभिवादन केले. कार्यक्रमाचे संयोजन सुधीर रसे, अभय माथने, सदाशिव खडके , नयना जोशी, गोपाल चंदन, तुषार खेरडे, आशिष राठोड यांनी केले. भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.