पर्यावरण पूरक ई सेवा बसेसचा प्रवाशांनी लाभा घ्यावा : आ. संजय गायकवाड

१२ ई बसेसचा लोकापर्ण सोहळा पहिली बस संतनगरी शेगांवला रवाना

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
बुलढाणा,
Buldhana e-buses महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळामध्ये आमुलाग्र बदल होत असून प्रदूषणमुक्त पर्यावरण मोहीम राबवण्याच्या दृष्टिकोनातून बॅटरीवर इलेट्रिक चार्जिंग द्वारे चालणार्‍या ई बसेस मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्याच्या मुख्यालय असलेल्या बुलढाणा आगारांमध्ये १२ ई बसेस दाखल झाल्या असून त्या बसेसच्या सर्व घटकातील प्रवाशांनी या बससेवेचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी दि. २५ डिसेंबर बुलढाणा बसस्थानक वर लोकार्पण प्रसंगी केले.
 
 

 Buldhana e-buses 
बुलढाणा बसस्थानक वरून अनेक मार्गावर ह्या बसेस धावणार असून अमृत ज्येष्ठ नागरिक,महिला सन्मान योजना, ज्येष्ठ नागरिक ५०%सवलत ,आवडेल तेथे प्रवास पास, ई योजना या बसेस मध्ये सवलत परवानगी असून प्रवाशांनी या बसेसचा बहुसंख्य ने लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक अमोल गडलिंग यांनी यावेळी केले. एकूणच एस टी महामंडळ ने प्रवाशी सेवा दर्जेदार होण्याच्या दृष्टीने आणि पर्यावरण पूरक बसेस आणून बुलडाणा जिल्ह्याच्या वैभव मध्ये भर पडली आहे असा मानस जनसामान्य प्रवाशी नागरिक यांच्या मध्ये आशावाद निर्माण झाला आहे.
बुलढाणा आगार व्यवस्थापक अमोल गडलिंग यांनी आयोजीत केलेल्या या उदघाटन कार्यक्रमाला विभाग नियंत्रक शुभांगी शिरसाट, विभागीय वाहतूक अधिकारी डीगांबर जाधव, स्वीय सहाय्यक श्रीकृष्ण शिंदे कामगार अधिकारी राहुल तांबडे, लेखा अधिकारी अनिल बहिरम, विभागीय वाहतूक अधीक्षक हरीश नागरे, वाहतूक निरीक्षक सागर शेगोकार, स्थानकप्रमुख रामकृष्ण पवार, पद्माकर मगर, देवयानी बारी, रमेश आराख, राजेंद्र पवार, संतोष बावस्कर, सचिन शेळके, मंगेश ढॉण, राजेश आगाशे, संदीप गायकवाड, सचिन खिर्डेकर, प्रतिभा वानखेडे, शीला जाधव, सुरेश वखरे, संदीप कुलकर्णी, सतीश गोंधळी, स्वप्नील पाटील, प्रथमेश पोतदार, चांगदेव जगताप, दगडू रिंढे, इ व्ही ट्रेन्स कंपनीचे सिद्धार्थ बनसोड, विजय मोरे, इ प्रतिनिधी कामगार बांधव हजर होते.