यवतमाळात आतंकवाद्यांच्या पुतळ्याचे ‘दहन’

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
yavatmal-news : बांगलादेश येथे हिंदूंवर होणाèया अत्याचारा विरोधात येथील विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्यावतीने दत्त चौकात आतंकवाद्यांचा पुतळा दहन करीत घटनेचा निषेध केला.
 
 

dahan 
 
 
 
बांगलादेशमध्ये 18 डिसेंबरच्या रात्री हिंदू युवक दीपू चंद्र दास याची हत्या करण्यात आली होती. त्याने इस्लामचा अपमान केला होता, असा आरोप होता. या घटनेविरोधात आता भारतात ठिकठिकाणी दीपूच्या हत्येच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करीत आंदोलने करण्यात येत आहे. येथील हिंदू संघटनांच्या वतीने दत्तचौकात बुधवारी, 24 डिसेंबर रोजी हिंदू संघटना विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी आतंकवाद्यांचा पुतळा दहन करीत बांगलादेश विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध व्यक्त केला.
 
 
बांगलादेशात सत्ता परिवर्तनानंतर हिंदूंवर सतत अत्याचार होत आहे. हिंदू समाजाला त्या ठिकाणी सुरक्षा द्यावी व एक वेगळे राज्य द्यावे, तसेच भारत सरकारने बांगलादेश सरकार व आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करून बांग्लादेशसोबत असलेली नातेसंबंधे आणि आर्थिक देवाण-घेवाणवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी या निषेध आंदोलनाच्या माध्यमातून विश्व हिंदू परिषदेचे प्रांतसेवा प्रमुख राम लोखंडे यांनी केली. यावेळी मोठ्या संख्येने सकल हिंदू महिला, विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते.