कोळसा खाणीतील स्फोटामुळे जखमी मजुराला नुकसान भरपाई देण्याची मागणी

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
वणी, 
coal-mine-explosion : तालुक्यातील घोन्सा कोळसा खाणीत स्फोटामुळे काम करणाèया मजुरांच्या अंगावर मोठे दगड पडल्याने त्यात एक मजूर गभीर जखमी झाला आहे. त्यामुळे या शेतमजुराला नुकसानभरपाई देऊन दोषी अधिकाèयांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी भाजपाचे राज्य परिषद सदस्य दिनकर पावडे यांनी एका निवेदनातून केली आहे.
 
 
 
ytl
 
 
 
वणी तालुक्यातील घोन्सा कोळसा खाणीत स्फोटामुळे उडणारे मोठमोठे दगड जवळील शेतात जाऊन पडतात. तसेच गावातील घरांना तडे जाणे, खाणीलगतच्या राज्य मार्ग क्र. 314 ने जाणाèया नागरिकांच्या वाहनांवर दगड पडणे या गोष्टी घडत असतात. त्यातच घोन्सा येथील असलेल्या हनुमान मंदिरातील मुर्तीची शेंदराचा लेप लावलेले आवरण स्फोटामुळे तडा जाऊन मूळमुर्तीपासून वेगळे झाले आहे. त्यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.
 
 
हा प्रकार मागील पाच वर्षांपासून सुरू आहे. परंतु वेकोली प्रशासन आपले उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या प्रयत्नात सामान्य जनतेला होणाèया त्रासाकडे दुर्लक्ष करीत आहे. असाच प्रकार 23 डिसेंबर रोजी घडला. स्फोटामुळे एक महिला शेतकरी प्रणाली रविंद्र जरीले हिच्या पायावर दगड पडून ती जखमी झाली. यापूर्वी तिचे पती रविंद्र जरीले यांच्या अंगावरही दगड पडल्याची घटना घडल्यामुळे परिसरातील नागरिकांत तीव्र असंतोष निर्माण होऊन ‘रस्ता रोको’ करुन वेकोलीची वाहतूक बंद करण्यात आली होती.
 
 
घटनेची तीव्रता लक्षात घेता पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु दोषी अधिकाèयांवर गुन्हे दाखल करण्यात यावे व अपघातात जखमी झालेल्या महिलेला नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी दिनकर पावडे यांनी तहसीलदार निखिल धुळधर यांना निवेदनातून करण्यात आली. याप्रसंगी सागर धवने, मेघराज नागो वाभीटकर, अतुल रमेश जरीले, जाफर इस्माईल शेख हे उपस्थित होते.