स्वर्गाचे दरवाजे उघडले, आता ''त्याने'' मरून जावं!

death-wish-putin-christmas झेलेंस्कीची नाताळानिमित्त प्रार्थना

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
 
death-wish-putin-christmas युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेंस्कीने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या मृत्यूची प्रार्थना केली आहे. आज नाताळाच्या निमित्ताने येशू ख्रिस्ताकडे प्रार्थना करताना, झेलेंस्की म्हणाले की, पुतिनने युक्रेनला खूप दु:ख दिलं आहे. आज आम्हा सर्वांचे एकच स्वप्न आहे, एकच इच्छा आहे की, पुतिनने मरून जावं. युक्रेनियन जनतेला नाताळाच्या निमित्ताने संबोधित करताना, नाव न घेता, त्यांनी पुतिनच्या मृत्यूची प्रार्थना केली.
 
 
 
death-wish-putin-christmas
 
 
death-wish-putin-christmas नाताळाच्या दिवशी स्वर्गाची दारं उघडतात, अशी मान्यता आहे. त्याचा उल्लेख करून झेलेंस्की म्हणाले की,‘युक्रेनियन नागरिकांचा विश्वास आहे की, नाताळाच्या रात्री स्वर्गाची दारं उघडतात आणि त्यावेळी जर आपण एखादी मनोकामना व्यक्त केली तर ती नक्कीच पूर्ण होते. आज आपण सगळ्यांचे एकच स्वप्न आणि एकच प्रार्थना आहे की, आम्हा सगळ्यांसाठी तो आता या जगात राहू नये.’ मात्र, त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही.
 
 
death-wish-putin-christmas दरम्यान, नाताळाच्या पूर्वसंध्येला युक्रेनच्या अनेक भागांमध्ये रशियाने मोठ्या प्रमाणावर मिसाईल हल्ले केले. यात 3 जण ठार झाले असून, युक्रेनच्या विविध भागांमध्ये वीजपुरवठा खंडीत झाला. आज नाताळाच्या दिवशीही युक्रेनवर 22 ड्रोन्सने 15 क्षेत्रांमध्ये मोठं नुकसान केलं आहे. आपल्या शुभेच्छा संदेशात झेलेंस्की यांनी नागरिकांना मजबूत राहून देशासाठी उभे राहण्याचे आवाहन केले. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाèया हुतात्मा जवानांना त्यांनी आदरांजली अर्पण केली.
 
 
death-wish-putin-christmas ‘या अंधारातही आपला मार्ग चुकणार नाही. आपण सर्वजण सोबत आहोत आणि तुमच्या मनात युक्रेन आहे. आपल्या प्राणांची पर्वा न करता, तुम्ही राष्ट्रासाठी काम केले आहे. नाताळाच्या दिवशी तूफान गोळीबार, शेकडो ड्रोन हल्ले, बॅलिस्टीक क्षेपणस्त्रांनी हल्ले, किंझाल हल्ले...हा त्यांचा ईश्वरविहिन हल्ला आहे,’ असे झेलेंस्की म्हणाले.