जिल्ह्यातील 647 विद्यार्थ्यांनी दिली जिल्हास्तर अंतिम महादीप परीक्षा

सीसीटीव्ही कॅमेरा नियंत्रित घेण्यात आली महादीप परीक्षा

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
final-mahadeep-examination : आदिवासीबहुल यवतमाळ जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा वेध घेणाèया महादीप परीक्षेचे आयोजन गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषद शिक्षण विभाग यवतमाळ करीत आहे. पाचव्या वर्षीही या परीक्षेला जिल्ह्यातून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या परीक्षेत शाळास्तर, केंद्रस्तर, तालुकास्तर, या चाळणी परीक्षेतून तब्बल 662 विद्यार्थी प्रविष्ट होते.
 
 
ytl
 
या गुणवंत विद्यार्थ्यांची जिल्हास्तर महादीप अंतिम परीक्षेचे आयोजन 25 डिसेंबरला जगदंबा इंजिनिअरिंग कॉलेज ऑफ टेक्नॉलॉजी यवतमाळ येथे करण्यात आले होते. या परिक्षेत जिल्ह्यातील इयत्ता पाचवी ते आठवीपर्यंत शिक्षण घेणाèया 647 गुणवंत विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
 
 
यात मराठी माध्यमाची 538 व उर्दू माध्यमाच्या109 विद्यार्थ्यांचा सामावेश होता. या परीक्षेच्या आयोजनासाठी 21 वर्ग खोल्यांत सीसीटीव्ही नियंत्रणात बैठक व्यवस्था करण्यात आली होती. महादीप परीक्षा अंतिम फेरीत घेण्यात आली. या परीक्षेचा अंतिम रणसंग्राम थांबला असून या परीक्षेच्या निकालाकडे विद्यार्थ्यासह जिल्ह्यातील पालकांचे लक्ष लागले आहे.
 
 
या शैक्षणिक उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा, उपशिक्षणाधिकारी नीता गावंडे, उपशिक्षणाधिकारी डॉ. शिल्पा पोलपेल्लीवार, विस्तार अधिकारी तथा जिल्हा समन्वयक प्रणिता गाढवे, विस्तार अधिकारी राजू मडावी, गटशिक्षणाधिकारी पोपेश्वर भोयर, गटशिक्षणाधिकारी मंगेश देशपांडे यांच्या नियंत्रणात करण्यात आली. या आयोजनासाठी जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, तालुका समन्वयक, मुख्याध्यापक व शिक्षकांनी पुढाकार घेतला.
 
 
या परीक्षा नियोजन व व्यवस्थापनासाठी प्राचार्य डॉ. शितल वातीलेंसह समन्वयक राजकुमार भोयर, जिशान नाजिश, श्याम माळवे, योगेश दिघडे, राजहंस मेंढे, प्रीती ओरके, दत्तात्रय गावंडे, विजय ढाले, रेखा भगत, नीलिमा पाटील, नलिनी डवरे यांनी प्रयत्न केले.