शाहजहानपूरमध्ये रेल्वेच्या धडकेत पाच जणांचा मृत्यू

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
शाहजहानपूर,
Five people died in a train accident उत्तर प्रदेशातील शाहजहानपूर जिल्ह्यातील एका रेल्वे क्रॉसिंगवर भीषण अपघात घडून पाच जणांचा जागीच मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रोजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अतसालिया रेल्वे क्रॉसिंगवर ही घटना घडली. रेल्वे रुळ ओलांडत असताना वेगाने येणाऱ्या ट्रेनने एका दुचाकीला जोरदार धडक दिली आणि क्षणात पाच जणांचा जीव गेला. प्राथमिक माहितीनुसार, पाच जण एकाच दुचाकीवरून रेल्वे क्रॉसिंग ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. त्याच वेळी लखनऊकडून येणारी गरीब नवाज एक्सप्रेस भरधाव वेगात त्या ठिकाणी पोहोचली आणि दुचाकीला थेट धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीचे अक्षरशः तुकडे झाले आणि वाहनावरील सर्व प्रवाशांना सावरण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.
 
 
uop
 
अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. मृतांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. सर्वांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. सध्या पोलिस मृतांची ओळख पटवण्याचे काम करत असून अपघात नेमका कशामुळे झाला, याचा तपास सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण शाहजहानपूर शहरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.