नवी दिल्ली,
green-tea-illegal अरावलीच्या व्याख्येत बदलाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने ‘चहा’ची व्याख्याही बदलली आहे. भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) स्पष्ट केले आहे की ‘चहा’ हा फक्त त्या उत्पादनासाठी वापरला जाऊ शकतो जो कॅमेलिया सायनेन्सिस या वनस्पतीपासून बनलेला असेल. तसेच एफएसएसएआयने फूड बिझनेस ऑपरेटर्स (एफबीओएस) ला कडक इशारा दिला आहे की, कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीपासून न बनलेल्या पेयांना—जसे की औषधी वनस्पती किंवा फुलांपासून तयार केलेले—चहा म्हणणे बेकायदेशीर आहे.

जर हर्बल टी किंवा ग्रीन टीला चहा म्हणून ब्रँडिंग केली गेली, तर ती भ्रामक जाहिरात आणि चुकीच्या लेबलिंगच्या अंतर्गत येईल. एफएसएसएआयने २४ डिसेंबरला जारी केलेल्या आदेशात सांगितले की, अनेक कंपन्या ‘हर्बल टी’, ‘रुईबोस टी’, ‘फ्लॉवर टी’ असे उत्पादन चहा म्हणून विकत आहेत, पण प्रत्यक्षात ही उत्पादने चहाच्या वनस्पतीपासून बनलेली नाहीत. नियमांनुसार ‘चहा’ हा शब्द फक्त कॅमेलिया सायनेन्सिस पासून बनलेल्या पेयांसाठी वापरता येईल. यात कांगडा चहा, ग्रीन टी आणि इंस्टंट टी यासारख्या प्रकारांचा समावेश आहे. green-tea-illegal एफएसएसएआयने स्पष्ट केले की, हर्बल किंवा इतर वनस्पतीपासून बनलेले पेय या वनस्पतीपासून न बनल्यास त्यांना चहा म्हणणे चुकीचे आणि भ्रामक आहे, तसेच हे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स एक्ट, २००६ चे उल्लंघन ठरेल. प्राधिकरणाने मॅन्युफॅक्चरिंग, पॅकिंग, मार्केटिंग, आयात, विक्री आणि ई-कॉमर्ससंबंधी सर्व व्यवसायांना निर्देश दिले आहेत की अशा उत्पादनांसाठी ‘टी’ हा शब्द थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या वापरू नये. तसेच राज्यातील अधिकाऱ्यांनाही आदेश देण्यात आले आहेत की, ऑनलाइन विक्रेते आणि इतर सर्व एफबीओएसवर नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी.
यामुळे आता हर्बल टी, डिटॉक्स टी, फ्लॉवर टी यांसारख्या ड्रिंक्सची नावे बदलावी लागणार आहेत. green-tea-illegal तरीही ही पेये बाजारात उपलब्ध राहतील, पण चहा या नावाने विकली जाणार नाहीत. एफएसएसएआय चा हा निर्णय चहाच्या व्याख्येबाबत बाजारात निर्माण झालेल्या भ्रमाला दूर करतो आणि ग्राहकांना हे समजण्यास मदत करतो की त्यांच्या कपात असलेले पेय खरी चहा आहे की फक्त हर्बल इन्फ्यूजन. चहा संबंधी बाजारात अनेक वर्षांपासून भ्रमाची परिस्थिती निर्माण होती.