ऑनलाइन ऑर्डर करता? 'या' दिवशी डिलिव्हरी कर्मचारी संपावर

देशव्यापी संप घोषित

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली 
online delivery strike देशातील प्रमुख फूड डिलिव्हरी आणि ई-कॉमर्स कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या डिलिव्हरी कर्मचार्‍यांनी २५ आणि ३१ डिसेंबर २०२५ रोजी देशव्यापी संप करण्याची घोषणा केली आहे. ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांवर हा दबाव वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे कामगार संघटनांनी म्हटले आहे.
 

 online delivery strike  
तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स यांनी ही संप पुकारली असून, मेट्रो शहरे आणि टियर-२ शहरांमध्ये डिलिव्हरी कर्मचारी यात सहभागी होण्याची शक्यता जास्त आहे. संघटनांचा दावा आहे की, ऑनलाइन डिलिव्हरीच्या कामगारांची परिस्थिती सतत बिघडत आहे आणि त्यांना अनेक गंभीर समस्या भेडसावत आहेत.कामगार संघटनांनी म्हटले आहे की, वेतन ठरविणे, कामाची उद्दिष्टे निश्चित करणे यावर प्लॅटफॉर्म कंपन्यांचे अल्गोरिदमवर पूर्ण नियंत्रण आहे. यामुळे डिलिव्हरीची जोखीम कर्मचाऱ्यांवरच ढकलली जात आहे. तसेच, डिलिव्हरी पोहोचवण्याची कालमर्यादा खूप कठोर करण्यात आली आहे, तर प्रोत्साहन भत्त्यांच्या नियमांमध्ये सतत बदल होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
संघटनांच्या मते, online delivery strike सणासुदीच्या काळात आणि मागणी जास्त असलेल्या काळात ग्राहकांना अन्न व पॅकेजेस वेळेत पोहोचवण्यात डिलिव्हरी कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावतात. तरीही, त्यांना घटलेले उत्पन्न, अनिश्चित तास, अचानक वर्क आयडी ब्लॉक होणे आणि मूलभूत सुरक्षा व कल्याणकारी योजना नसणे यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.डिलिव्हरी कर्मचार्‍यांना पेमेंट अयशस्वी होण्याच्या घटनांपासून बचाव, विश्रांतीची निश्चित वेळ, आरोग्य विमा, अपघात संरक्षण आणि पेन्शनसारखे फायदे मिळावेत, अशी मागणी संघटनांनी केली आहे. याशिवाय कर्मचाऱ्यांनी १० मिनिटांत डिलिव्हरी करण्याची सेवा बंद करण्याची मागणी देखील ठेवली आहे.
 
 
 
या निर्णयामुळे देशभरातील ऑनलाइन शॉपिंग आणि फूड डिलिव्हरी सेवांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. कंपन्या आणि कामगार संघटनांमध्ये चर्चा होत आहेत, पण तरीही संपासाठी ठरलेले दिवस ठरलेले आहेत.