प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये जाणार?

चर्चाना आले उधाण

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
पुणे,
Is Prashant Jagtap join the Congress पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना गती मिळाली आहे. अजित पवार आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येण्याचे जवळपास ठरले असून, बैठका आणि जागा वाटपासंबंधी चर्चा सुरू आहेत. मात्र, या एकत्रिकरणावरून शरद पवार गटातील पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी आधीच सांगितले होते की, दोन्ही गट एकत्र आल्यास मी पक्षातून राजीनामा देईन. अखेर सुप्रिया सुळेंच्या पत्रकार परिषदेनंतर प्रशांत जगताप यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
 
prashant jagtap
 
 
या निर्णयानंतर आता प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का, यावर चर्चा रंगू लागल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशांत जगताप हे काँग्रेस पक्षाच्या नेत्यांशी संपर्कात आहेत आणि पुण्यातील स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येत असल्याने नाराज असलेले प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना ठाकरे पक्षातील काही नेतेही प्रशांत जगताप यांच्याशी संपर्कात असल्याचे समजते. जगताप यांनी स्पष्ट केले की, मी काँग्रेस विचारांचा आहे, ज्यामुळे आता त्यांच्या काँग्रेसमध्ये प्रवेशाची शक्यता अधिक प्रबल झाली आहे.