मुस्लिम कुटुंबातील लाल खान यांनी बुंदेली भाषेत रचले रामचरित मानस

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
लखनऊ,
Lal Khan's Ramcharitmanas in Bundeli language लखनऊतील बुंदेलखंडातील बिजना येथील रहिवासी लाल खान यांनी मुस्लिम कुटुंबात जन्म घेतला, तरीही रामायणाशी त्यांचा जन्मापासूनच घनिष्ठ संबंध आहे. हिंदू संस्कृती, सण, भजन आणि रामचरित मानस वाचनामुळे ते लहानपणापासून प्रभावित झाले. त्यांच्या या दीक्षा आणि समर्पणामुळे त्यांनी श्री रामचरित मानस बुंदेली भाषेत भाषांतरित केले, ज्यासाठी त्यांना ‘मानस रत्न’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
 
 
dfarey6tru
लाल खान म्हणाले की, त्यांच्या कुटुंबात पूर्वजांपासून रामायण वाचनाची परंपरा होती. वडिलांसोबत ते ब्राह्मणांबरोबर बसून रामचरित मानस गायचे, आई-वडील गात असल्याने तेही गायला लागले. पुढे गावातील लोक त्यांना सतत रामायण पठणासाठी आमंत्रित करत असत. त्यांना श्री रामचरित मानसचे बुंदेली भाषेत भाषांतर पूर्ण करण्यास लाल खान यांना तीन वर्षे लागली. या काळात त्यांच्या जवळ नेहमीच तीन वानर येत असत, असे ते सांगतात. त्यांनी आपले जीवन भजन, कीर्तन आणि धार्मिक कार्यांमध्ये समर्पित केले आहे.
१४ जानेवारी २०२३ रोजी लाल खान यांना दिल्ली येथे ‘मानसरत्न’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. लाल खान म्हणाले की, मुस्लिम धर्मात जन्मलो तरी त्यांनी नेहमीच हिंदू धर्माबद्दल प्रेम आणि सुसंवाद राखला आहे. त्यांच्या गावात सर्व सण हिंदू रीतिनुसार साजरे केले जातात आणि सर्वजण त्यांचा आदर करतात. लाल खान यांनी आपल्या जीवनातील अनुभव सांगताना भूदान चळवळीचा उल्लेखही केला. १९६८ मध्ये विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीत त्यांनी भाग घेतला आणि ‘अमर है तेरा नाम बापू…’ हे गाणे गायले. त्यांनी विनोबा भावे यांच्यामुळे भारतातील सुसंवाद, गोहत्याविरोधी आणि धार्मिक आदरभावना आत्मसात केल्या.