नागपूर ते इटारसी या तिसर्‍या उद्या वेग चाचणी

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
नागपूर,
nagpur-to-itarsi-speed-test : नागपूर ते इटारसी या तिसर्‍या मार्गिकेवर २६ डिसेंबर रोजी वेग चाचणी घेतल्या जाणार आहे. रेल्वेच्या विस्तार प्रकल्पांतर्गत मुलताई दरम्यान १५.२६ ट्रॅक किलोमीटर (टीकेएम) लांबीच्या तिसर्‍या रेल्वे मार्गिकेचे काम यशस्वीपणे पूर्ण झाले आहे. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. नव्याने बांधलेल्या तिसर्‍या मार्गिकेवर तपासणीअंतर्गत वेग चाचणी घेण्यात येणार आहे.
 
 
 
jk
 
अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने व आधुनिक अभियांत्रिकी मानकांनुसार हे काम पूर्ण करण्यात आले आहे. या विभागात १ रोड ब्रिज, २५ लघुपूलांची उभारणी करण्यात आली असून त्यामध्ये एक लिमिटेड हाइट सबवेचा समावेश आहे. तसेच लेव्हल क्रॉसिंग क्रमांक २६५ ची तरतूद करण्यात आली असून मुलताई स्थानकाचे रिमॉडेलिंग करण्यात आले आहे. या सर्व कामांमुळे रेल्वे परिचालन क्षमता लक्षणीयरीत्या वाढणार आहे.
 
तिसरी मार्गिका कार्यान्वित झाल्यानंतर नागपूर मार्गे गाड्यांची वेळपालन क्षमता सुधारेल तसेच प्रवासी व मालवाहतूक अधिक सुलभ होईल. भविष्यातील वाहतूक गरजा लक्षात घेऊन रेल्वे पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यात येत आहेत. वेग चाचणी दरम्यान ट्रॅक, ओव्हरहेड इक्विपमेंट, व दूरसंचार यांसह सर्व तांत्रिक बाबींची सखोल तपासणी करण्यात येईल, ज्यामुळे सर्वोच्च स्तराची सुरक्षितता सुनिश्चित केली जाईल.