यवतमाळ,
navjayhind-sports-club : बुलढाणा येथे झालेल्या 44 व्या विदर्भ खो-खो अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धेत नवजयहिंद क्रीडा मंडळाच्या मुलामुलींनी यवतमाळ संघाकडून सहभाग घेत या स्पर्धेत मुलींच्या संघाने उपविजेतेपद प्राप्त केले. तर मुलांच्या संघाने तृतीय स्थान प्राप्त केले होते. या स्पर्धेमधून नवजयहिंद क्रीडा मंडळाच्या पाच खेळाडूंची विदर्भ खो-खो संघात निवड झाली आहे. यात मुलांमध्ये अमोलकचंद महाविद्यालयाच्या तेजस जवाहर देठे, चेतन गजानन पुरके तर मुलींमध्ये अभ्यंकर कन्या शाळेच्या कोमल राजेंद्र मडावी, श्रावणी नंदगीर गिरी, आचल गजानन काळे यांचा समावेश आहे. हे खेळाडू 29 डिसेंबर ते 5 जानेवारी दरम्यान गुंजूर बंगळुरू (कर्नाटक) येथे होणाèया राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत विदर्भ खो-खो संघाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ते आपल्या यशाचे श्रेय आईवडील तसेच नवजयहिंद क्रीडा मंडळाचे प्रदीप वानखेडे, अमोल बोदडे, अविनाश जोशी, कैलास शिंदे, बाळासाहेब दौलतकार, अमोल ढोणे, आशिष प्यारलेवार, प्रशिक्षक पंकज रोहनकर, अविनाश जोशी, जम्मू लालूवाले यांना देतात.