नाताळ प्रार्थनासभेसाठी पंतप्रधान मोदींची चर्चमध्ये उपस्थिती

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
नवी दिल्ली,
PM Modi's presence at church पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी दिल्लीतील द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन येथे नाताळच्या सकाळच्या विशेष प्रार्थनासभेत सहभागी झाले. या सोहळ्यात दिल्ली आणि उत्तर भारतातील मोठ्या संख्येने ख्रिश्चन समुदायाचे सदस्य उपस्थित होते. प्रार्थनासभेत कॅरोल गायन, स्तोत्रे आणि दिल्लीचे बिशप राईट रेव्हरंड पॉल यांच्या पंतप्रधानांसाठी केलेल्या विशेष प्रार्थनांचा समावेश होता. पंतप्रधानांनी या सोहळ्यादरम्यान प्रेम, शांती आणि करुणेचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला.
 
 

mofi 
पंतप्रधान मोदींनी इंस्टाग्रामवर पोस्ट करत सांगितले, दिल्लीतील द कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशन येथे नाताळच्या सकाळच्या प्रार्थनासभेत भाग घेतला. या सेवेने प्रेम, शांती आणि करुणेचा शाश्वत संदेश प्रतिबिंबित केला. नाताळची भावना आपल्या समाजात सुसंवाद आणि सद्भावना निर्माण करो. पंतप्रधानांनी नागरिकांना नाताळाच्या शुभेच्छाही दिल्या. ते म्हणाले, "सर्वांना शांती, करुणा आणि आशेने भरलेल्या नाताळाच्या शुभेच्छा. येशू ख्रिस्ताच्या शिकवणी आपल्या समाजात सुसंवाद आणि ऐक्य वाढवोत. असे त्यांनी लिहले.