गडचिरोलीत होणार्‍या अभाविप 54 व्या विदर्भ प्रांत अधिवेशनाच्या पोस्टरचे अनावरण

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
गडचिरोली, 
vidarbha provincial convention तरुणाईला दिशा व प्रेरणा देणारे व नेतृत्वाला उभारी देणारे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे 54 वे विदर्भ प्रांत अधिवेशन 9 ते 11 जानेवारी दरम्यान गडचिरोलीत होणार आहे. अधिवेशनाच्या पोस्टरचे अनावरण नुकतेच राष्ट्रीय मंत्री पायल किनाके, पश्‍चिम क्षेत्रिय संघटन मंत्री गीतेश चव्हाण, प्रांत संघटन मंत्री विक्रमजित कलाने, प्रांत सहसंघटन मंत्री मनोज साबळे, प्रांत कार्यालय मंत्री महेश डोकरीमारे, गडचिरोली विभाग संघटन मंत्री राहुल शामकुवर, गडचिरोली नगर मंत्री संकेत मस्के यांच्या उपस्थितीत गडचिरोली येथे अनावरण करण्यात आले.
 

ABVP 
 
 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारी जगातली सर्वात मोठी विद्यार्थी संघटन आहे. यावर्षी अभाविपने देशभरात 76,98,448 सदस्यांची नोंदणी करून जगातील सर्वांत मोठे विद्यार्थी संघटन म्हणून विक्रम प्रस्थापित केला. या अधिवेशनात विदर्भ प्रांतातील कानाकोपर्‍यातून विद्यार्थी युवक-युवती एकत्रित येत असतात.vidarbha provincial convention या अधिवेशनात विविध शैक्षणिक व सामाजिक समस्यांवर सर्व विद्यार्थ्यांचे मत घेऊन त्या समस्या सोडविण्यासाठी प्रस्ताव पारित होतात. या माध्यमातून विदर्भात शोभायात्रा निघून त्यामध्ये सुद्धा युवा नेतृत्वाला मंच मिळत असतो. सोबतच प्रांत अधिवेशनात नूतन कार्यकारिणीची निवड देखील होणार आहे.