हॉलिवूड अभिनेत्री इमानी दिया स्मिथची हत्या

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
न्यू जर्सी,
The murder of Imani Dia Smith हॉलिवूड इंडस्ट्रीत एक दु:खद घटना समोर आली आहे. २५ वर्षांच्या अभिनेत्री इमानी दिया स्मिथचा न्यू जर्सीमध्ये मृत्यू झाला आहे. तिचे शरीर धारदार शस्त्राने जखमी अवस्थेत आढळले आणि तातडीने रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मिडलसेक्स काउंटी अभियोजक कार्यालयाच्या माहितीनुसार, इमानी एडिसन येथील घरात जखमी अवस्थेत आढळली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले आणि तपास सुरू केला.
 

Actress Iman Diya S 
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इमानीच्या बॉयफ्रेंड जॉर्डन डी. जॅक्सन स्मॉल्स यावर हत्या आणि बेकायदेशीर शस्त्रधारणा यासह अनेक आरोप असून त्याच्यावर पोलिसांचा संशय आहे. सध्या हत्येचे कारण तपासले जात आहे. इमानीच्या कुटुंबाला या घटनेमुळे धक्का बसला असून, तिच्या मागे आई-वडील, तीन वर्षांचा मुलगा आणि दोन लहान भाऊ आहेत. बालकलाकार म्हणून ‘द लायन किंग’ चित्रपटात काम करून तिने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तिच्या अकस्मात मृत्यूनंतर हॉलिवूड इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.