आज तभाच्या शताब्दीनिमित्त कोवळी उन्हे

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
वर्धा, 
kovali unhe तरुण भारतच्या शताब्दीनिमित्त वर्धेत आज २५ रोजी स्थानिक सत्यनारायण बजाज वाचनालय येथे सायंकाळी ६ वाजता देश विदेशात लोकप्रिय झालेला निर्मळ विनोदी, मनोरंजक ‘कोवळी उन्हे’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
 
 
तभा
 
 
कोवळी उन्हे हा मुंबई येथील मेघना साने निर्मित, लिखित आणि अभिनित आगळावेगळा कार्यक्रम आहे. नर्म विनोदी आणि सकारात्मक विचार देणारा एक निर्मळ व आनंददायी असा हा कार्यक्रम आहे. रंजकता आणि मुल्यांची जपणूक याचा सुंदर मेळ याच्यात साधला आहे. यात कथा, कविता, एकपात्री, किस्से, नकला व गीते असे विविध प्रकार सादर केले जाणार आहेत.kovali unhe मेघना साने या इस्रायलमध्ये जाऊन एकपात्री कार्यक्रम करणार्‍या पहिल्या मराठी महिला कलाकार आहेत.
मेघना साने यांनी व्यावसायिक रंगभूमीवर अभिनेत्री म्हणून नाट्यसंपदाच्या तो मी नव्हेच व सुयोगच्या लेकुरे उंदंड झाली या नाटकांचे जवळपास ५ वर्षे सातत्याने प्रयोग केले. कोवळी उन्हेचे आता ३०० हून अधिक प्रयोग झाले आहेत. या कार्यक्रमाचा जास्तीत जास्त वर्धेकर रसिकांनी लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.