संगणक टंकलेखन परीक्षेची व्हिडीओग्राफी

- परीक्षार्थींची बायोमॅट्रीक हजेरीही घेणार - बोगसपणा थांबणार, कसोटी लागणार

    दिनांक :25-Dec-2025
Total Views |
अनिल फेकरीकर
नागपूर, 
Computer typing test : संगणक टंकलेखनासह शॉर्ट हॅण्ड परीक्षेत होत असलेला सावळागोंधळ यावेळी व्हिडीओग्राफीच्या माध्यमाने संपुष्टात आणण्याचा प्रयत्न होणार आहे. हो, तशाच स्वरूपाचा धाडसी निर्णय प्रथमच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांनी घेतला आहे. महाराष्ट्रातील 4 हजार संस्थांमधील सुमारे 1 लाख 77 हजार मुले - मुली या संगणक टंकलेखन आणि शॉर्ट हॅण्ड परीक्षेला बसणार आहेत. ही संगणक टंकलेखनाची परीक्षा 5 ते 17 जानेवारी 2026 दरम्यान होईल. तर शॉर्ट हॅण्डची परीक्षा 18 ते 21 जानेवारी 2026 या काळात होणार आहे.
 
 
ngp
 
संगणक टंकलेखन परीक्षा ही सातत्याने सावळागोंधळाशिवाय पूर्णच होत नव्हती, असाच तिचा पूर्व इतिहास राहिला आहे. तोच काळाकुट्ट इतिहास पुसून टाकण्यासाठी पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी धाडसी आणि दूरगामी निर्णय घेतला आहे. त्यानुसार उमेदवारांची लाईव्ह व्हिडीओग्राफी केली जाईल. याकरिता 100 केंद्रांवर लाईव्ह सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. शिवाय परीक्षार्थींचा चेहरा तपासून बायोमेट्रिक हजेरी नोंदविण्यात येईल. त्याचबरोबर सर्व परीक्षा केंद्रांवर केंद्र संचालकांच्या व्यतिरिक्त अजून एक तांत्रिक सहाय्यक शासकीय विभागातील असणार आहे. त्यांचेमार्फत प्रत्येक केंद्रावर संपूर्ण परीक्षेचे लाईव्ह रेकॉर्डिंग घेण्यात येणार आहे. परीक्षा सुरू झाल्यानंतर दुसèया गती उताèयाचे सेक्शन संपल्यानंतर बायोमेट्रिक हजेरीला सुरुवात केली जाईल. एकदा विद्यार्थी केंद्राच्या आत आल्यावर त्यांना परीक्षा संपेपर्यंत बाहेर जाण्याची अनुमती राहणार नाही. यावेळी परीक्षा परिषदेसोबतच सर्व शिक्षणाधिकारी यांना सॉफ्टवेअरच्या माध्यमातून त्यांच्या जिल्ह्याचे लाईव्ह रेकॉर्डिंग उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या डॅशबोर्डच्या माध्यमातून कोणता विद्यार्थी, कोणकोणते सेक्शन सोडवत आहे, याची रिअल टाईम माहिती मिळेल. परीक्षा परिषदेमध्ये अध्यक्ष यांच्यासोबतच आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, अधीक्षक व मूल्यमापन अधिकारी यांना देखील लाईव्ह डॅशबोर्ड देण्यात येणार आहे.
 
 
एकंदरीत पाहता संगणक टंकलेखनासह शॉर्ट हॅण्डची परीक्षा शिस्तीत व्हावी यासाठी सर्व प्रयत्न महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने करण्यात येत आहेत. दरम्यान, परीक्षा काळात केंद्र संचालकांसह इतरांकडेही मोबाईल राहणार नाही असा नियम करायला हवा. मॉक टेस्टच्या माध्यमाने बोगसपणासाठी होणारे संवाद थांबायले हवेत. नव्हे मॉक टेस्ट हीसुद्धा इन कॅमेरा घ्यावी. कुणी तांत्रिक बिघाडाच्या नावाखाली थेट प्रक्षेपण थांबविल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जावी. यासंदर्भातही परिषदेने पुढाकार घेतल्यास खरोखरच संगणक टंकलेखनाची परीक्षा बोगस कामे करणाèयांसाठी घाम फोडणारी ठरेल अन् प्रामाणिक लोकांना न्याय मिळेल.
पारदर्शकता यायला हवी
 
 
संगणक टंकलेखनासह शॉर्ट हॅण्डची परीक्षा महत्त्वपूर्ण आहे. त्यांचे महत्त्व अबाधित राहावे याकरिता आम्ही पारदर्शकता आणण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. सर्वांनी सहकार्य करून हा प्रयोग यशस्वी करावा, अशी भूमिका महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ.नंदकुमार बेडसे यांनी तरुण भारतशी बोलताना मांडली.